जुने शहरातील गुन्हेगारांची टाेळी दाेन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:18 IST2021-09-13T04:18:30+5:302021-09-13T04:18:30+5:30

जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहत येथील रहिवासी अर्जुन राजु घाटे वय २५, महादेव मधुकर श्रीनाथ वय २४ ...

The old city criminals were banished for two years | जुने शहरातील गुन्हेगारांची टाेळी दाेन वर्षांसाठी हद्दपार

जुने शहरातील गुन्हेगारांची टाेळी दाेन वर्षांसाठी हद्दपार

जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहत येथील रहिवासी अर्जुन राजु घाटे वय २५, महादेव मधुकर श्रीनाथ वय २४ व मनाेहर ऊर्फ महादेव रमेश साेनाेने वय ३२ तिघेही रा़ शिवसेना वसाहत, जुनेे शहर हे तिघे जण जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांना मिळाली. या माहितीवरून तीनही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या तिघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून जुने शहर पोलिसांनी या तीन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. जुने शहर पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत या तिघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली; मात्र तिन्ही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने या तीन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Web Title: The old city criminals were banished for two years