अकोला मार्गे ओखा-मदुरै उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला जूनपर्यंत मुदतवाढ

By Atul.jaiswal | Updated: May 18, 2024 12:11 IST2024-05-18T12:10:38+5:302024-05-18T12:11:04+5:30

प्रवाशांच्या सोयीसाठी ही साप्ताहिक रेल्वे आता २८ जूनपर्यंत धावणार आहे. या गाडीला अकोला येथे थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.

Okha-Madurai Summer Special Express via Akola extended till June | अकोला मार्गे ओखा-मदुरै उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला जूनपर्यंत मुदतवाढ

अकोला मार्गे ओखा-मदुरै उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला जूनपर्यंत मुदतवाढ

अकोला : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होत असलेली प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने ओखा-मदुरै-ओखा उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही साप्ताहिक रेल्वे आता २८ जूनपर्यंत धावणार आहे. या गाडीला अकोला येथे थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.

मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, ०९५२० ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २४ जून २०२४ पर्यंत दर सोमवारी २२:०० वाजता प्रस्थान स्थानकावरून रवाना होऊन चौथ्या दिवशी मदुरै स्थानकावर ११:४५ वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दर मंगळवारी २२:१५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

परतीच्या प्रवासात ०९५१९ मदुरै-ओखा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ जून २०२४ पर्यंत दर शुक्रवारी १:१५ वाजता स्थानकावरून रवाना होऊन तिसऱ्या दिवशी १०:२० वाजता ओखा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी दर शनिवारी सकाळी १० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

Web Title: Okha-Madurai Summer Special Express via Akola extended till June

टॅग्स :Akolaअकोला