अधिका-यांना बिंदू नामावलीची धास्ती!

By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:22+5:302015-12-05T09:09:22+5:30

कामकाजाची गती मंदावली

Officers are scared of point margin! | अधिका-यांना बिंदू नामावलीची धास्ती!

अधिका-यांना बिंदू नामावलीची धास्ती!

अकोला: महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी तांत्रिक संवर्गातील पदांनंतर, आता अतांत्रिक संवर्गातील कर्मचार्‍यांची बिंदू नामावली तयार करण्याचा आदेश दिला असला तरी, नियमबाह्य पदोन्नत्यांचे पितळ उघडे पडण्याच्या धास्तीने सदर कामाची जबाबदारी सोपविलेले अधिकारी-कर्मचारी बिंदू नामावली तयार करताना हात आखडता घेत असल्याची माहिती आहे. मनपाची बिंदू नामावली, तसेच सुधारित आकृतीबंधाचा विषय क्लिष्ट असल्याचे भासवत, स्थानिक अधिकारी-कर्मचार्‍यांनी आजपर्यंत वरिष्ठ अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. कर्मचार्‍यांना नियमानुसार पदोन्नती देणे तर दूरच, प्रशासनाने २00४ पासून बिंदू नामावलीच अद्ययावत केलेली नाही. मध्यंतरी या मुद्यावर राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग समितीचे अध्यक्ष सी.एल. थूल यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत, आयोगाकडे ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश प्रशासनाला दिला होता. त्यावर प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही. मनपाची सूत्रे स्वीकारताच, आयुक्त अजय लहाने यांनी बिंदू नामावलीच्या विषयाला हात घातला आणि स्थानिक अधिक ारी-कर्मचार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली. प्रत्येक विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांची संख्या, आजपर्यंंत देण्यात आलेली पदोन्नती व त्याची प्रक्रिया, सरळ सेवा प्रवेशानुसार केलेली पदभरती, सर्व वर्गांसाठीचे रोस्टर, आदींची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी सामान्य प्रशासन विभागाला दिले होते.

Web Title: Officers are scared of point margin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.