पुरातत्त्व विभागाचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात!

By Admin | Updated: December 7, 2015 02:40 IST2015-12-07T02:40:13+5:302015-12-07T02:40:13+5:30

पुरातत्त्व विभागाचे कार्यालय संगणकीकृत भूमापन अभिलेखागार विभागाच्या इमारतीमध्ये कार्यान्वित.

Office of the Archaeological department in the office of the Collector! | पुरातत्त्व विभागाचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात!

पुरातत्त्व विभागाचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात!

अकोला: भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अकोला उपमंडळाचे वरिष्ठ सहाय्यक कार्यालय शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील संगणकीकृत भूमापन अभिलेखागार विभागाच्या इमारतीमध्ये कार्यान्वित करण्यात आले. खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पुरातत्त्व विभागाच्या नागपूर येथील अधीक्षक नंदिनी भट्टाचार्य साहू, वरिष्ठ सहाय्यक मिलिंद अंगाईतकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहाय्यक सर्वेक्षण अकोला उपमंडळ कार्यालय कार्यान्वित करण्यात आले. यावेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण उपमंडळ कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Office of the Archaeological department in the office of the Collector!