सैलानीबाबाच्या चरणी सव्वा किलो चांदीची छत्री अर्पण
By Admin | Updated: March 4, 2015 02:32 IST2015-03-03T23:42:22+5:302015-03-04T02:32:31+5:30
सैलानी येथे संदल निमित्त देशातील कानाकोप-यातून भाविक दाखल.

सैलानीबाबाच्या चरणी सव्वा किलो चांदीची छत्री अर्पण
चिखली (जि. बुलडाणा) : लाखो हिन्दु-मुस्लीम बांधवांचे ङ्म्रध्दास्थान असलेल्या सैलानीबाबांच्या चरणी चिखली येथील वीट कारखानदार हरीभाऊ राऊत यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवारी सव्वा किलो चांदीची छत्री अर्पण केली आहे.
लाखो भाविकांचे ङ्म्रध्दास्थान सैलानी येथे संदल निमित्त देशातील कानाकोपर्यातून भाविक दाखल होत असून आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपापल्या क्षमतेनुसार सैलानीबाबांच्या चरणी काही ना काही अर्पण करीत असतात. सैलानीबाबांचे निस्सीम भक्त हरीभाऊ राऊत यांनी सव्वा किलो चांदीची छत्री सैलानी चरणी अर्पण केली. यावेळी सैलानी बाबा दरगाह ट्रस्टचे अध्यक्ष अ.समद, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता खरात, प्रसिध्द कवी अजिम नवाज राही आदी उपस्थित होते.