अल्पवयीन साळीवर मातृत्व लादणा-या जावयाविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: December 16, 2014 00:58 IST2014-12-16T00:58:31+5:302014-12-16T00:58:31+5:30

नात्याला फासला काळिमा; दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीसाकडे तपास.

Offense against mother-in-law on child marriage | अल्पवयीन साळीवर मातृत्व लादणा-या जावयाविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन साळीवर मातृत्व लादणा-या जावयाविरुद्ध गुन्हा

अकोला : १५ वर्षीय साळीवर सातत्याने लैंगिक अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादणार्‍या नराधम जावयाविरुद्ध शहरातील रामदासपेठ पोलिसांनी सोमवारी सकाळी गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाचा तपास दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस करणार आहेत.
दर्यापूर तालुक्यातील एका गावामध्ये राहणार्‍या पीडित मुलीने रविवारी उशिरा रात्री दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या सावत्र बहिणीचा विवाह अमरावतीतील अंबा बाजार येथे राहणारा मंगेश गुंबळे(२0) याच्यासोबत झाला होता. जावई या नात्याने मंगेश पीडित मुलीच्या घरी महिने-दोन महिन्यांमधून यायचा, मुक्काम करायचा. नोव्हेंबर २0१३ मध्ये मुलीच्या वडिलांच्या मामेभावाचे निधन झाल्याने ते मुलगी, पत्नीला घेऊन भेटीसाठी खल्लार येथे गेले होते. दुसर्‍या दिवशी जावई मंगेश गुंबळे हा तेथे आला. त्याच्या मोटारसायकलवर बसून पीडित मुलगी व तिचे वडील गावी जाण्यासाठी निघाले. खल्लार रोडवरील सूतगिरणीजवळ वडिलांना चक्कर आल्याने ते मोटारसायकलवरून खाली उतरले. त्यांना काही सुचत नसल्याने आरोपीने त्यांना रस्त्याच्या कडेला बसविले. नंतर त्याने मुलीचा हात पकडून तिला ओढत सूतगिरणीजवळील शेतात आणले आणि या ठिकाणी त्याने तिचे बळजबरीने लैंगिक शोषण केले. त्यानंतर आरोपी मंगेश हा अधूनमधून पीडितेच्या घरी येत असे आणि आई-वडील घरी नसताना बळजबरीने तिला शरीरसंबध ठेवण्यास भाग पाडत असे. १ डिसेंबर रोजी पीडितेची प्रसूती झाली. रविवारी उशिरा रात्री तिने रामदासपेठ पोलीस तक्रार दाखल केली

Web Title: Offense against mother-in-law on child marriage