लिलाव झालेल्या जमिनीच्या वहितीस अडथळा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 21:07 IST2021-07-04T21:07:18+5:302021-07-04T21:07:27+5:30
Murtijapur News : जमिनीचे वारस असल्याचे सांगत काहींनी वहीतीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लिलाव झालेल्या जमिनीच्या वहितीस अडथळा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मूर्तिजापूर : तालुक्यात वेळ वेगवेगळ्या ठिकाणी येथील लक्ष्मीबाई देशमुख देशमुख यांनी १९ ३५ मध्ये आपली १५० एकर शेती जमीन दान दिली होती. यातील सिरसो येथील काही एकर जनीचा जाहीर लिलाव करुन एक वर्षासाठी वहीतीस देण्यात आली होती. परंतु रविवारी आम्ही या जमिनीचे वारस असल्याचे सांगत काहींनी वहीतीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे लिलाव प्रक्रिया करून एक वर्षासाठी सिरसो येथील भाग क्रमांक १ मधील ५ हेक्टर १० आर जमीन सुनील ढवळे राहणार सिरसो यांनी वहीतीसाठी घेतली होती परंतु लक्ष्मीबाई देशमुख याचे वारसदार असल्याचे सांगून ज्योती विजय देशमुख, साक्षी विजय देशमुख व उल्हास दिनकर देशमुख यांनी शेत जमीन पेरणीस मज्जाव केला आहे. येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या दीडशे एकर मधील ९३ एकर शेतजमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी अतिक्रमणमुक्त करून लिलावात काढली ही जमीन वेगवेगळ्या ठिकाणी असून वेगवेगळ्या लोकांनी बोली लावून वहीतीसाठी घेतली. २५ जून रोजी फिर्यादी सुनील मनोहर ढवळे राहणार सिरसो त्यांना जमीनीचा ताब दिला असता शेतीची टॅक्टर द्वारे मशागत करीत असता लक्ष्मीबाई देशमुख यांच्या काही वारसांनी य शेतीच्या मशागतीच्या कामात अडथडा आणून काम बंद पाडले व फिर्यादी सुनील ढलळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी श्रीमती ज्योती विजय देशमुख, कु साक्षी विजय देशमुख व उल्हास दिनकर देशमुख सर्व राहणार मूर्तिजापूर याच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ४४७,३४१,२९४,५०६,३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीबाईंच्या वारस ज्योती विजय देशमुख यांनी रविवारी शेत वहिती करण्यासाठी मज्जाव केला असता उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीसांनी ज्योती देशमुख सदर जमीन शासनाच्या अधिनस्थ असल्याची वस्तुस्थिती समजावून सांगितली, परंतु त्यांनी ऐकून न घेतल्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.