शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांसमोर अडथळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 10:50 AM

ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला; मात्र या पर्यायाचा वापर करताना, विद्यार्थ्यांसह पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यतील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. परीक्षा रद्द करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नसल्याने, त्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला; मात्र या पर्यायाचा वापर करताना, विद्यार्थ्यांसह पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत दीक्षा अ‍ॅपसह व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून दिले; परंतु विद्यार्थी, पालकांकडे भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणात अडथळे निर्माण झाले आहेत. अकोला जिल्ह्यात २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर काही दिवसांमध्ये परिस्थिती नियंत्रणात येऊन शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग सुरू होतील, अशी अपेक्षा होती; परंतु सुरू न झाल्याने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला.विविध शैक्षणिक लिंकद्वारे, विविध अ‍ॅप, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्याचे शहरी भागासह ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांनी अनुकरण केले. पालकांना सुट्या असल्यामुळे त्यांचे स्मार्टफोन विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले; परंतु दररोजच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण द्यावयाचे झाल्यास त्यात अनेक अडचणी आहेत. काही शाळांनी व्हर्च्युअल, ऑनलाइन क्लास रूम सुरू केल्या आहेत.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना अडचणी येत आहेत. पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. आहे तर त्यात इंटरनेट सुरू करण्यासाठी पैसे नाहीत. स्मार्टफोन असेल तर नेटवर्कची समस्या आहे.-तुलसीदास खिरोडकर, तंत्रस्नेही शिक्षकशहरी भागात ऑनलाइन शिक्षण घेताना अडचणी नाहीत; परंतु ग्रामीण भागात भौतिक सुविधा नसल्यामुळे आॅनलाइन शिक्षण देताना, शिक्षकांना अडचणी येत आहेत. यातून मार्ग कसा काढावा, असा प्रश्न आहे; परंतु शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. टीव्ही, रेडियाच्या माध्यमातूनसुद्धा शिक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे.-डॉ. समाधान डुकरे, प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था

ग्रामीण भागात ३५ टक्के पालकांकडेच स्मार्टफोन६५ टक्के मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यातही शहरी भागातील पालकांची टक्केवारी अधिक आहे. ग्रामीण भागात मात्र ३५ टक्के पालकांकडे स्मार्टफोन आहेत. त्यातही इंटरनेट, नेटवर्कची समस्या आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAkolaअकोलाStudentविद्यार्थी