मतपत्रिकेवरील कपबशी चिन्हावर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:36+5:302021-01-13T04:46:36+5:30

मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी म्हणून मशीन सील करण्यासाठी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना तहसील कार्यालयात बोलाविले होते. त्यावेळी उमेदवार व त्यांच्या ...

Objection to the pumpkin symbol on the ballot paper | मतपत्रिकेवरील कपबशी चिन्हावर आक्षेप

मतपत्रिकेवरील कपबशी चिन्हावर आक्षेप

मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी म्हणून मशीन सील करण्यासाठी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना तहसील कार्यालयात बोलाविले होते. त्यावेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी कपबशी ही निशाणी स्पष्ट व ठळकपणे दिसत नसल्याने आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकारी व तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदारांकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी चिन्हे निवडणूक आयोगाने दिलेल्या ऑनलाइन चिन्हानुसार प्रिंटिंग करण्यात आली असल्याचे सांगितले. तरीही अनेकांचे समाधान न झाल्याने तहसीलदार राजेश गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे कळवू, त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करू, असे सांगितले.

--------------

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडली पाहिजे. कपबशी हे चिन्ह अस्पष्ट दिसत असून, ती ठळक व स्पष्ट दिसायला हवी.

- गोपाल कोल्हे, उमेदवार प्रतिनिधी, अडगाव

Web Title: Objection to the pumpkin symbol on the ballot paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.