पावसाच्या आगमनाने पुन्हा नर्सरी फुलली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:15+5:302021-06-18T04:14:15+5:30

असे आहेत रोपांचे दर रोपे किंमत (रुपये) गुलाब ...

The nursery blossomed again with the arrival of rain! | पावसाच्या आगमनाने पुन्हा नर्सरी फुलली!

पावसाच्या आगमनाने पुन्हा नर्सरी फुलली!

असे आहेत रोपांचे दर

रोपे किंमत (रुपये)

गुलाब ५०

मोगरा ७०-८०

जास्वंद ७०-८०

सोनचाफा ३००

कन्हेर १५०

सदाफुली १२०

डेझी १५०

आंबा ३००

चिकू ३००

नारळ ३००

तुळशी ४०

कुंदा १२०

कुंडीचा दरही ६० ते २०० पर्यंत

फुलांची रोपे, शोभिवंत रोपे लावण्यासाठी प्रत्येक जण मातीच्या कुंडीचा वापर करीत असे; परंतु काही वर्षांपासून प्लास्टिकच्या कुंड्यांचा वापर वाढला आहे. शहरातील रस्त्यांच्या कडेला रोपांसोबत कुंड्याही विक्रीस आल्या आहेत. ६० ते २०० रुपयांपर्यंत या कुंड्यांचे दर आहेत.

पावसाच्या आगमनामुळे रोपांची मागणी वाढली आहे. शहरासह ग्रामीण भागातील लोक रोपे घेऊन जात असून फुलांच्या रोपांना सर्वाधिक मागणी आहे. ५० ते ३०० रुपयांपर्यंत रोपे उपलब्ध आहेत.

- वेणुपाल, नर्सरी संचालक

तुळस, अश्वगंधाच्या रोपांची मागणी

कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हाच एकमेव उपाय असल्याचे समोर आले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन नागरिक करू लागल्याने औषधी वनस्पतींचे महत्त्वही वाढले आहे. नागरिकांनी नर्सरी विक्रेत्यांकडे याविषयी विचारणा करून त्यांच्याकडून तुळस, अश्वगंधाच्या रोपांची मागणी केली आहे. त्यामुळे घरच्या गच्चीतील बागेत गवती चहा, कृष्ण तुळस, गुळवेल, पानवेल या औषधी वनस्पतींचा बहर आला आहे.

Web Title: The nursery blossomed again with the arrival of rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.