आता विकासाच्या राजकारणाची अपेक्षा!

By Admin | Updated: October 27, 2014 01:21 IST2014-10-27T01:21:56+5:302014-10-27T01:21:56+5:30

अकोला जिल्ह्यातील राजकारण विकासके द्री करण्याची अपेक्षा.

Now the expectation of development politics! | आता विकासाच्या राजकारणाची अपेक्षा!

आता विकासाच्या राजकारणाची अपेक्षा!

अकोला : जिल्ह्यातील राजकारण जाती-पातीवर टिकून आहे. जाती-पातीच्या राजकारणा तून बाहेर न पडू शकलेल्या येथील लोकप्रतिनिधींना विकासाची गंगा मुंबई, दिल्लीतून अकोल्यापर्यंत आणण्यात नेहमीच अपयश आले. आतापर्यंत राज्यात, दिल्लीत विरोधकांचे राज्य असल्याची सबब येथील लोकप्रतिनिधी देत होते. ज्यांची सत्ता त्यांच्या आमदार, खासदारांना मुंबई, दिल्लीत झुकते माप मिळते, यात कुणाचेही दुमत नाही. त्यामुळे अकोल्या तील जनतेने येथील लोकप्रतिनिधींच्या शब्दावर विश्‍वास ठेवत भाजपच्या उमेदवाराला पुन्हा दिल्लीत पाठविले. त्यापाठोपाठ पाचपैकी चार आमदारही मुंबईला पाठविले. अकोला पश्‍चिममधून भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्यावर पाचव्यांदा मतदारांनी संपूर्ण विश्‍वास दर्शविला. दिग्गज उमेदवारांच्या लढतीत त्यांनी बाजी मारली. मूर्तिजापूरमध्येसुद्धा भाजपने गड राखला. हरीश पिंपळे यांच्यावरच मूर्तिजापूर-बाश्रीटाकळीतील मतदारांनी विश्‍वास दर्शविला. आकोटमधून प्रकाश भारसाकळे आणि अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर या भाजप उमेदवारांना अकोला जिल्ह्यातील उमेदवारांनी विधानसभेवर पाठविले. भारसाकळे जिल्ह्यातून प्रथमच निवडून आले असले तरी त्यांच्या पाठीशी यापूर्वी चारवेळा आमदार होण्याचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी नवे असले तरी मुंबई त्यांच्यासाठी नवीन नाही. त्यामुळे आ. शर्मा यांच्यासोबतच आ. भारसाकळे यांच्यासारखे अनुभवी लोकप्रतिनिधी जिल्ह्याला मिळाले आहेत. दुसर्‍यांदा विधानसभेत पोहोचलेले हरीश पिंपळे यांचा अनुभवही जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्यास सहायक ठरणार आहे. या अनुभवी लोकप्र ितनिधींसोबत प्रथमच मुंबई गाठणारे रणधीर सावरकर यांचा भाजप पक्ष संघटनेत असलेला वट बघता त्यांच्याकडूनही जनतेला विकासाची अपेक्षा राहील.

Web Title: Now the expectation of development politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.