शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

आता भाजपचे लक्ष्य ‘मिनी मंत्रालय’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 1:28 PM

मिनी मंत्रालयाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची तर वंचित बहुजन आघाडी अन् काँग्रेस आघाडीसाठी अतिस्तावाच्या लढाईची ठरणार आहे.

- राजेश शेगोकार

अकोला: लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेले यश व वंचित बहुजन आघाडीचा ढासळलेला बुरूज पाहता आता भाजपसमोर जिल्हा परिषद निवडणूक हेच लक्ष्य असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेवर भाजपने आतापर्यंत झेंडा फडकविला नसल्याने शतप्रतिशत भाजप हे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी मिनी मंत्रालयाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची तर वंचित बहुजन आघाडी अन् काँग्रेस आघाडीसाठी अतिस्तावाच्या लढाईची ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांनी अकोल्यात घेतलेल्या सभेत खासदार संजय धोत्रे यांनी जिल्हा परिषदेवर हल्लाबोल करीत ‘नवी पाइपलाइन’ टाकण्याची भाषा केली होती. तो संदर्भ भाजपने गांभीर्याने घेतला असून, विधानसभेच्या निवडणुकीतच जिल्हा परिषदेच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी तसेच इतर पक्षातील कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचे प्रकार झाले आहेत.जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंची सत्ता असून, भारिपचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना लक्ष्य कारण्यासाठी धोत्रेंनी लोकसभेच्या प्रचारात जिल्हा परिषद निवडणुकीचे आव्हान प्रचारातच दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून विधानसभेच्या आखाडयातून ‘ वंचित’ला पूर्णपणे बाद करण्यात भाजप यशस्वी झाले आहे. अकोला पूर्व, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार मतदारसंघात भाजपने यशाचा झेंडा गाडला असल्याने येथून जिल्हा परिषदेत मतांचे भरघोस पीक येईल या अपेक्षेत भाजपचे नेते आहेत. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांनी चांगले काम केले त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रचारात इतर पक्षातील चांगले कार्यकर्ते आपल्याकडे वळवून भाजपने सुरुवात केली असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट होत आहे. विजयासाठी दिलेली झुंज इशाराच!जिल्हा परिषदेचे मतदार असलेल्या ग्रामीण भागातील चारही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना विजयासाठी वंचित बहुजन आघाडीने चांगलेच झुंजवले आहेत. भाजपाचे जिल्हा परिषदेसाठी ‘३५ प्लस’ हे मिशन ठरविल्याची यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे हे मिशन गाठण्यासाठी भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.मोदी लाट ओसरली अशी हाकाटी पिटत विरोधकांनी प्रचाराचा धुराळा उडविला; मात्र २०१४ पेक्षाही अधिक २०१९ मध्ये मोदी लाटेचा तडाखा बसला. लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवित भाजपाने आपला जनाधार आणखी मजबूत केला असून, आता अकोल्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासह जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे ‘लक्ष्य’ समोर ठेवले आहे.  

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाAkola ZPअकोला जिल्हा परिषदPoliticsराजकारण