शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण नोंदणीसाठी दुसऱ्या टप्प्यातील ‘एनसीडी’ केंद्राला मिळाले नाहीत टॅब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 13:50 IST

अनेक जिल्ह्यांना अद्यापही टॅब न मिळाल्याने रुग्णांची नोंद पारंपरिक पद्धतीनेच सुरू आहे.

अकोला : असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त रुग्णांचे निदान करून त्यांचा संपूर्ण उपचार व्हावा, या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे राज्यभरात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पॉपुलेशन बेस सर्व्हे सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी झाला आहे; मात्र दुसºया टप्प्यात अनेक जिल्ह्यांना अद्यापही टॅब न मिळाल्याने रुग्णांची नोंद पारंपरिक पद्धतीनेच सुरू आहे.राज्यात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजारांचे वेळीच निदान होऊन रुग्णांना योग्य उपचार मिळावा, यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गत वर्षभरापासून राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत जिल्हा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर रुग्णांची तपासणी करून, असंसर्गजन्य आजारांचे निदान करण्यात येत आहे. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक या सारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. या रुग्णांची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत एएनएम परिचारिकांमार्फत करण्यात येत आहे. रुग्णावर झालेल्या संपूर्ण उपचाराची नोंद केंद्रीकृत आणि आॅनलाइन व्हावी, या उद्देशाने पॉपुलेशन बेस सर्व्हे अंतर्गत टॅबचा उपयोग करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात विभागातील अमरावती आणि वाशिमसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची नोंद टॅबवर करण्यात आली होती; मात्र बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही टॅब उपलब्ध न झाल्याने रुग्णांची नोंद पारंपरिक पद्धतीनेच होत आहे.कम्युनिटी हेल्थ आॅफिसरची महत्त्वाची भूमिकाया उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात कम्युनिटी हेल्थ आॅफिसरचे पद भरण्यात आले आहेत. बीएमएस डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आशा आणि एएनएम रुग्णांची नोंद ठेवणार आहेत. यासाठी त्यांना ६ महिन्यांचे प्रशिक्षणही दिले आहे. त्यांच्यावरच असंसर्गजन्य आजारांचे निदान व रुग्णांच्या सर्वांगीण उपचाराची जबाबदारी राहणार आहे.जिल्ह्यात पॉपुलेशन बेस सर्व्हे अंतर्गत असंसर्गजन्य आजारांवर विशेष लक्ष दिले जात आहे. उपक्रमांतर्गत ‘एएनएम’कडे टॅब दिला जाणार आहे. रुग्णाच्या संपूर्ण उपचारापर्यंतची माहिती त्यामध्ये अद्ययावत केली जाणार आहे. यापूर्वी हा उपक्रम राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यशस्वी राबविण्यात आला आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य