शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ६0 हजार शिक्षकांचे आजपासून असहकार आंदोलन

By admin | Updated: March 10, 2015 02:05 IST

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राज्य शासन गंभीर नसल्याचा आरोप.

अकोला - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राज्य शासन गंभीर नसल्याने तसेच लेखी आश्‍वासन देऊन आश्‍वासनांची पूर्तता करण्यात येत नसल्याने राज्यातील सुमारे ६0 हजार कनिष्ठ महाविद्यालयील शिक्षकांनी १0 मार्चपासून विदर्भ ज्युनियर टिचर्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या असहकार आंदोलनाद्वारे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उत्तर पत्रिका तपासणीवर असहकार आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्नांवर तीन महिन्यात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्‍वासन देण्यात आले होते; मात्र यावर अद्यापही निर्णय घेण्यात येत नसल्याने विदर्भ ज्युनियर टिचर्स असोसिएशनने असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या शिक्षकांना रोज २५ उत्तरपत्रिका तपासणे आवश्यक आहे; मात्र या असहकार आंदोलनात सदर शिक्षक दिवसातून केवळ २ ते ३ उत्तरपत्रिका तपासणार आहेत. मागील आंदोलनात काढलेल्या शासन आदेशाची अंमलबजावणी करणे, १ नोव्हेंबर २00५ पूर्वी नियुक्त टप्पा अनुदानातील शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, २४ वर्षानंतर विनाअट सरसकट निवडश्रेणी देण्यात यावी, विद्यार्थी हितासाठी ११ वी व १२ वीचे विज्ञान व गणित विषयाचे पेपर पूर्वीप्रमाणे दोन करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी विदर्भ ज्युनियर टिचर्स असोसिएशन व महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.