क्रीडा संकुलातील अवाजवी शुल्कास लागणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:56 IST2021-01-08T04:56:32+5:302021-01-08T04:56:32+5:30
क्रीडा आयुक्त यांच्यासोबत अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व राज्य क्रीडाशिक्षक महासंघ अहमदनगर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बालेवाडी पुणे येथे बैठक ...

क्रीडा संकुलातील अवाजवी शुल्कास लागणार चाप
क्रीडा आयुक्त यांच्यासोबत अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व राज्य क्रीडाशिक्षक महासंघ अहमदनगर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बालेवाडी पुणे येथे बैठक पार पडली. मैदाने, कोर्ट वापराच्या वाढीव शुल्क आकारणी संदर्भात व खेळाडू व्यतिरिक्त इतरांना आरक्षित करण्यात आलेल्या मैदानावरील वेळेबाबत तसेच फीट इंडिया उपक्रमाच्या यशस्वी आयोजन व वाढीव कार्यभार, बीपीएड-एमपीएड-एनआयएस बेरोजगार युवकांना क्रीडा प्रशिक्षक नियुक्ती देण्याबाबत महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे यांनी अवगत केले. खेळाडूंसाठी मैदाने खुली करण्यासंदर्भात दिरंगाई होत असून, लवकरात लवकर मैदाने खुली करावित याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. बैठकीत सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा होऊन कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश आयुक्तांनी दिले.
या बैठकीस दत्तात्रय हेगडकर, महादेव फाफाळ, बाबूराव दोडके, शेखर कुदळे यांच्यासह अकोला जिल्ह्यातील प्रदीप थोरात, प्रभाकर रुमाळे, बुडण गाढेकर आदींची उपस्थिती होती.