ना फिजिकल डिटन्स, ना मास्क, विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST2021-02-05T06:19:46+5:302021-02-05T06:19:46+5:30
शाळा सुरू झाल्याने, पालकांनी समाधान व्यक्त केले. शाळेत मुलांची लक्षणीय उपस्थिती आहे. शिक्षकही एकाग्रतेने अध्यापन करीत आहेत. परंतु कोरोनाचे ...

ना फिजिकल डिटन्स, ना मास्क, विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांची दमछाक
शाळा सुरू झाल्याने, पालकांनी समाधान व्यक्त केले. शाळेत मुलांची लक्षणीय उपस्थिती आहे. शिक्षकही एकाग्रतेने अध्यापन करीत आहेत. परंतु कोरोनाचे नियम पालन करण्यासाठी मुलांच्या मागे लागावे लागते. थोडीबहुत कसरत करावी लागत आहे.
संतोष झामरे, शिक्षक, जि. प. शाळा किनखेड
शाळांकडून शासन नियमांचे पूर्ण पालन होत आहे. परंतु, लहान मुलांकडून नियमांचे पालन करून घेताना, कसरत करावी लागत आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करण्यासाठी मुलांच्या सातत्याने मागे राहावे लागते.
प्रकाश घाटोळे, शिक्षक, जागृती विद्यालय
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येते. लहान मुलांकडून बऱ्याचदा दुर्लक्ष होते. परंतु, त्यासाठी मुलांना वारंवार मास्कचा वापर, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करण्यासाठी सांगावे लागते. शिक्षकही मुलांवर लक्ष ठेवून असतात.
आनंद साधू, मुख्याध्यापक, महाराष्ट्र माध्यमिक शाळा