‘रिमोट’द्वारे वीज चोरी करणाऱ्यांची आता खैर नाही; महावितरणची आजपासून विशेष मोहीम
By Atul.jaiswal | Updated: September 1, 2018 12:12 IST2018-09-01T12:08:07+5:302018-09-01T12:12:58+5:30
अकोला : नवनवीन युक्ती वापरून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणकडून रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी करणाºयांविरोधात राज्यभरात १ सप्टेंबर २०१८ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

‘रिमोट’द्वारे वीज चोरी करणाऱ्यांची आता खैर नाही; महावितरणची आजपासून विशेष मोहीम
अकोला : नवनवीन युक्ती वापरून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणकडून रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी करणाºयांविरोधात राज्यभरात १ सप्टेंबर २०१८ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाºया कंपनी विरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
महावितरणच्यावतीने वीज चोरीवर आळा घालण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. वीज चोरी रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते; परंतु अलीकडच्या काही वर्षांत रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुंबईत ३० आॅगस्ट २०१८ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीज चोरीच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्याचा व कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम १ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
तांत्रिक कारागीर ‘रडार’वर
महावितरणच्या विद्युत मीटरमध्ये फेरफार करण्याचे कसब या यंत्रणेशी संबंधित कुशल कारागीर किंवा तंत्रज्ञांकडेच असते. वीज ग्राहकांकडून काही हजार रुपये घेऊन हे कारागीर रिमोट कंट्रोल तयार करून देतात. अशा तांत्रिक कारागिरांवरही आता महावितरणची करडी नजर आहे.
वीज चोरीची माहिती देणाºयास बक्षीस
रिमोटद्वारे वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीज चोरीची माहिती देणाºयांना वीज चोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरूपात बक्षीस म्हणून देण्यात येते, तसेच अशी माहिती देणाºयाचे नावदेखील गुप्त ठेवण्यात येते. त्यामुळे अशा वीज चोरीची माहिती देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
अकोला परिमंडळात पकडली ८० लाखांची वीज चोरी!
महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये सहा दिवस राबविण्यात आलेल्या मोहिमेत जवळपास ८० लाखांची वीज चोरी पकडण्यात आली. यामध्ये अकोला ३४ लाख, बुलडाणा ३४ लाख व वाशिम जिल्ह्यात ११ लाखांची वीज चोरी उघड झाली.