धक्कादायक......सुटे पैसे नसल्याने वाहकाने महिलेला बसमधून उतरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:19 IST2019-06-19T16:18:42+5:302019-06-19T16:19:03+5:30
मूर्तिजापूर (अकोला): तिकीटासाठी सुटे पैसे नसल्यामुळे बस वाहकाने महिला प्रवाशाला रस्त्यातच उतरवून दिल्याची संतापजनक घटना बुधवारी सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या मुर्तीजापूर ते एंडली बसमध्ये घडली

धक्कादायक......सुटे पैसे नसल्याने वाहकाने महिलेला बसमधून उतरविले
मूर्तिजापूर (अकोला): तिकीटासाठी सुटे पैसे नसल्यामुळे बस वाहकाने महिला प्रवाशाला रस्त्यातच उतरवून दिल्याची संतापजनक घटना बुधवारी सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या मुर्तीजापूर ते एंडली बसमध्ये घडली
मूर्तिजापूर बसस्थानकावरुन दररोज मूर्तिजापूर त ऐंडली ही बस धावते. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ८ वाजता बस क्रमांक एम एच ३० ८१४३ ही स्थानकावरुन सुटली. सदर बस आठवडी बाजार चौकात थांबली तेथून एक महिला ब्रम्ही खुर्द येथे जाण्यासाठी गाडीत चढली. बस एंडलीकडे मार्गस्थ झाल्यानंतर वाहक नेहमीप्रमाणे प्रत्येक प्रवाशांची तिकटे देत सदर महिले पर्यंत पोहचला. तोपर्यंत बस शहरापासून खुप अंतरावर गेली होती. दरम्यान, महिलेने तिकीटासाठी आपल्या जवळ असलेली पाचशे रुपयांची नोट वाहकाच्या हातात देऊन ब्रम्ही पर्यंतचे तिकीट देण्यास विनंती केली असता, वाहकाने सुटे नसल्याचे सांगत सदर महिलेस बसमधून खाली उतरण्यास सांगितले. वाहक एवढ्यावरच थांबला नाही, तर बस थांबवून सदर महिलेला अर्ध्या रस्त्यात उतरवून दिले. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून, सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त करीत वाहकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.