शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

आदिवासी विभागाच्या घोटाळ््यात कारवाईला ब्रेक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 4:04 PM

अकोला: आदिवासी योजनांच्या घोटाळ््यात एसआयटीच्या अहवालात सन २००४ ते ३१ मार्च २००९ दरम्यान कार्यरत ४७६ प्रकल्प अधिकारी-कर्मचारी दोषी ठरले आहेत.

अकोला: आदिवासी योजनांच्या घोटाळ््यात एसआयटीच्या अहवालात सन २००४ ते ३१ मार्च २००९ दरम्यान कार्यरत ४७६ प्रकल्प अधिकारी-कर्मचारी दोषी ठरले आहेत. त्यांच्यावर फौजदारी, शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी शासनाला मार्गदर्शन करणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी पी.डी. करंदीकर यांच्या समितीला शासनाने एप्रिल २०१९ अखेरपर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांमध्ये सहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी माजी न्यायमूर्र्ती एम.जी. गायकवाड समितीने एकूण ४७६ दोषींवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस यापूर्वीच शासनाकडे केली आहे. समितीच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त आयएएस अधिकारी पी.डी. करंदीकर यांची समिती नेमली. करंदीकर समितीच्या मदतीसाठी ‘एसआयटी’ने आदिवासी विकास विभागाच्या ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालय स्तरावर सेवानिवृत्त लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या अधिकाºयांकडे घोटाळ्यातील दोषींवर पोलिसात फौजदारी दाखल करण्याची जबाबदारी ७ एप्रिल २०१८ रोजी सोपविली. त्यानंतर समितीला आॅक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यासाठी करंदीकर समितीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील आयुक्तांनी शासनाकडे सादर केला. त्यानुसार समितीला आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने ३० आॅक्टोबर रोजीच घेतला आहे.शासनाने दोषींविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकारी किंवा सहायक प्रकल्प अधिकारी यांची नियुक्ती आधीच केली आहे. पोलिसात फौजदारी दाखल करताना आदिवासी योजनेत घोटाळेबाज अधिकाºयांवर फौजदारी तसेच प्रशासकीय कारवाई व्हावी, यासाठी करंदीकर समितीने मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. फौजदारी तक्रारी दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर समितीकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच विशेष चौकशी पथकांना कारवाईसाठी कार्यपद्धतीही निश्चित करून देण्याचे काम समितीकडे आहे.

समितीचा सहा महिन्यांचा खर्च ४२ लाख रुपयेकरंदीकर समितीला सहा महिने मुदतवाढ देताना या काळातील खर्चासाठी ४२ लाख ३२ हजार रुपये तरतूदही शासनाने केली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला