आराेप सिध्द हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:52 IST2021-02-20T04:52:33+5:302021-02-20T04:52:33+5:30

महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत संजय महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज यांच्या ...

No action should be taken against Sanjay Rathore till the allegations are proved | आराेप सिध्द हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको

आराेप सिध्द हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको

महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत संजय महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत पाेहरादेवी येथे ५ वाजता पाेहरादेवी विकास कामांसह संजय राठाेड , पूजा चव्हाण प्रकरणाची चर्चा करण्यात आली. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील ४ गावांसह वाशिम जिल्हयातील नायक कारभारी उपस्थित हाेते. पाेहरादेवी येथील नंगारा वास्तु विकासासंदर्भात चर्चा केल्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर चर्चा झाली. या प्रकरणात संजय राठोड यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत असून, त्याला कुठेतरी ब्रेक लागावा याकरिता, संजय राठोड यांच्यावर होत असलेले आरोप सिद्ध होईपर्यंत, त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्याचे ठरविण्यात आले. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन, त्यांना या बैठकीतील निर्णयाबाबत सांगण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांना महंत व बंजारा समाजाकडून निवेदन देणार - कबीरदास महाराज

पूजा चव्हाण प्रकरणात महंत व बंजारा समाजाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविणार असल्याची माहिती देवी सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबीरदास महाराज यांनी दिली. अनुकूल चव्हाण, जि.प.सदस्य लखनसिह राठोड, जि.प.सदस्य दिवाकर राठोड, उपसरपंच विनोद राठोड, उल्हास महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थित महंत व बंजारा समाज बांधवांच्यावतीने मुख्यमंत्री यांना निवेदन दिले जाईल. विरोधी पक्षाच्या दबावाला बळी पडू नये महंत व समाज संजय राठोड यांचे पाठीशी उभा आहे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येईल. संजय राठोड यांनी सह कुटूंब पोहरादेवी येथे दर्शनाकरिता येऊन येथील विकास कामाला गती द्यावी, असेही या बैठकीत ठरल्याची माहिती महंत कबीरदास महाराज यांनी दिली.

Web Title: No action should be taken against Sanjay Rathore till the allegations are proved