मनपाच्या विद्यार्थ्यांंना गणवेश नाही
By Admin | Updated: July 23, 2014 01:01 IST2014-07-23T01:01:59+5:302014-07-23T01:01:59+5:30
मनपा शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांंना शालेय गणवेश प्राप्त झाले नसल्याचे समोर आले.

मनपाच्या विद्यार्थ्यांंना गणवेश नाही
अकोला : शालेय सत्र सुरूहोऊन एक महिन्याचा कालावधी संपत आला तरी अद्यापपर्यंंतही मनपा शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांंना शालेय गणवेश प्राप्त झाले नसल्याचे समोर आले. यामुळे विद्यार्थ्यांंवर शालेय गणवेशाविनाच शाळेत जाण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या ५५ शाळेमध्ये मराठी,उर्दू व हिंदी माध्यमाचे एकूण ८ हजार ४0 विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. या सर्व विद्यार्थ्यांंना प्रती विद्यार्थी ४00 रुपये प्रमाणे शालेय गणवेश वाटपासाठी ३२ लाख १६ हजारांची आवश्यकता आहे. तसेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, दारिद्रय़रेषेखालील मुले तसेच सर्व मुली यांचा विचार केल्यास ५ हजार ६७६ लाभार्थी आहेत. या विद्यार्थ्यांंंना प्रती विद्यार्थी ४00 रुपये प्रमाणे शालेय गणवेशासाठी २२ लाख ७0 हजार ४00 रुपये अनुदानाची गरज आहे. शालेय सत्र सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी संपत आला तरी अद्यापही मनपातील चिमुकल्या विद्यार्थ्यांंना शालेय गणवेश उपलब्ध झाला नसल्याचे चित्र आहे. अंगवाडी, सेमी इंग्लिशचा प्रस्ताव लागू न झाल्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांंंची पटसंख्या दिवसेंदिवस घसरत आहे. त्यात भरीस भर विद्यार्थ्यांंंना गणवेशही उपलब्ध करून देण्यात मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेला अपयश येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. (प्रतिनिधी)