‘दमा दम मस्त कलंदर...निजामी बंधूंनी आणली मैफलीत रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:24 PM2019-08-19T12:24:25+5:302019-08-19T12:29:02+5:30

काळजाचे तार छेडणाऱ्या सुफी संगीताद्वारे निजामी बंधूंनी अकोलेकरांची मने जिंकून घेतली.

Nizami brothers sufi night concerts at Akola | ‘दमा दम मस्त कलंदर...निजामी बंधूंनी आणली मैफलीत रंगत

‘दमा दम मस्त कलंदर...निजामी बंधूंनी आणली मैफलीत रंगत

Next
ठळक मुद्दे एकाहून एक सरस रचना सादर करीत निजामी बंधूंनी हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या संदेश दिला.सुफियाना अंदाजात लोकमत समाचार आयोजित अली फाउंडेशन प्रस्तुत ‘सुफी नाइट’ची मैफल रंगवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच प्रमिलाताई ओक सभागृह हाऊसफुल्ल झाले होते.


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘दमा दम मस्त कलंदर, अली दा पहेला नंबर...’ सुफी गीताच्या या धूनवर निजामी बंधूंनी आपल्या सुफियाना अंदाजात लोकमत समाचार आयोजित अली फाउंडेशन प्रस्तुत ‘सुफी नाइट’ची मैफल रंगवली. काळजाचे तार छेडणाऱ्या सुफी संगीताद्वारे निजामी बंधूंनी अकोलेकरांची मने जिंकून घेतली.
सुप्रसिद्ध सुफी संगीतकार उस्ताद चंद निजामी, शदाब फरिदी आणि साहेराब फरिदी निजामी यांनी आपल्या सुफियाना अंदाजात ‘सुफी नाइट’च्या . प्रमिलाताई ओक सभागृह येथे रविवार, १८ आॅगस्ट रोजी लोकमत समाचार आयोजित अली फाउंडेशन प्रस्तुत ‘सुफी नाइट’ या कार्यक्रमाला अली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अजहर अली, कोषाध्यक्ष जाफर अली, ग्रीन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विवेक पारसकर, लोकमत अकोला युनिट हेड आलोककुमार शर्मा, अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले, लोकमत समाचारचे संपादकीय प्रमुख अरुणकुमार सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. मैफलीला ‘अल्ला हूँ अल्ला हूँ...’ या सुफी गीताने सुरुवात करीत ‘हो मेहंगा हो या सस्ता, अब तो सौदा कर लिया मैंने
कोई पुकारे अल्ला, कोई पुकारे भगवान...’ अशा एकाहून एक सरस रचना सादर करीत निजामी बंधूंनी हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या संदेश दिला. सुफी संगीतामधून भारताची विविधता प्रकट करीत निजामी बंधूंनी ‘तेरे रश्के कमर...’ या सुफी गीतांनी युवा मनाचे तार छेडले. या गीतावर रसिक प्रेक्षकांमधूनही जल्लोष करण्यात आला. काहींनी थेट मंचावर जाऊन निजामी बंधंूना ओवाळणी घातली. सुफी गीतांच्या या रंगतदार मैफलीत ‘कुन फायकुन...’ पिया घर आया या बहारदार गीतांनी अकोलेकर रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत. अकोलेकरांवर सुफी संगीताचा रंग चढत असताना ‘सुफी नाइट’च्या अंतिम टप्यात निजामी बंधूंनी
‘हर करम अपना करेंगे
ए वतन तेरे लिये....’
या देशभक्तीपर गीताने रसिक प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला. देशभक्तीवरील या गीताला सुरुवात होताच रसिक प्रेक्षकांमधून निजामी बंधूंना टाळ्यांची साथ मिळाली अन् कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. प्रास्ताविक लोकमत समाचारचे अरुणकुमार यांनी केले. संचालन व आभार लोकमत समाचारचे इमरान खान यांनी मानले.


कार्यक्रम हाऊसफुल्ल
लोकमत समाचार आयोजित अली फाउंडेशन प्रस्तुत ‘सुफी नाइट’ कार्यक्रमाला अकोलेकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच प्रमिलाताई ओक सभागृह हाऊसफुल्ल झाले होते.


सभागृहात जल्लोष
 निजामी बंधूंनी ‘तेरे रश्के कमर...’ या सुफी गीताची सुरुवात करताच रसिक प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सुफी गीताच्या तालावर थिरकत अकोलेकरांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Web Title: Nizami brothers sufi night concerts at Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.