शेतकरी संघटनेच्या ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य’ आंदोलनाची नितीन गडकरी यांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:28 PM2019-07-01T13:28:10+5:302019-07-01T13:28:17+5:30

अकोला: शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली असून, यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Nitin Gadkari's intervention for the 'freedom of technology' of the farmers' association | शेतकरी संघटनेच्या ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य’ आंदोलनाची नितीन गडकरी यांनी घेतली दखल

शेतकरी संघटनेच्या ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य’ आंदोलनाची नितीन गडकरी यांनी घेतली दखल

Next

अकोला: शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली असून, यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
देशातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे व एचटीबीटी कपाशीच्या वाणाच्या चाचण्या व प्रयोग सुरू करण्याविषयी शेतकरी संघटनेच्या अकोली जहागीर येथून सुरू झालेल्या आंदोलनाने महाराष्ट्रभर पेट घेतला आहे. या आंदोलनाचे पडसाद हरियाणातही उमटत आहेत. येत्या ५ जुलैला हरियाणामध्ये हे आंदोलन पेटण्याचे चिन्हे दिसत आहेत. भारतभर पसरत असलेल्या या आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने रस्ते व परिवहन मंत्री तसेच विदर्भाचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांचे पत्र गडकरींना दिले. शिष्टमंडळाच्या भेटीत सकारात्मक चर्चा होऊन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी दिल्ली येथे चर्चा घडवून आणता येईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. या शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित पाटील बहाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेश शर्मा, अमरावती जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख राजाभाऊ पुसदेकर, शेतकरी संघटनेच्या माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर व विजय नेव्हल उपस्थित होते.
 

 

Web Title: Nitin Gadkari's intervention for the 'freedom of technology' of the farmers' association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.