नऊ हजार बांधकाम मजुरांना दीड हजार; ४६ हजारांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:25+5:302021-04-21T04:19:25+5:30
--बॉक्स-- जिल्ह्यातील नोंदणी केलेले बांधकाम मजूर ३०,००० नोंदणी केलेल्यांपैकी नूतनीकरण केलेले मजूर ९,००० नोंदणी न केलेले मजूर २५,००० --कोट-- ...

नऊ हजार बांधकाम मजुरांना दीड हजार; ४६ हजारांचे काय?
--बॉक्स--
जिल्ह्यातील नोंदणी केलेले बांधकाम मजूर
३०,०००
नोंदणी केलेल्यांपैकी नूतनीकरण केलेले मजूर
९,०००
नोंदणी न केलेले मजूर
२५,०००
--कोट--
पोटापाण्याचे काय?
मुख्यमंत्र्यांनी नोंदणीकृत कामगारांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. कामगार आयुक्त कार्यालयात कामगारांची नोंदणी आवश्यक आहे. आता आमची नोंदणी आम्ही करणार आहोत. मात्र, नोंदणी केल्यानंतर राज्य शासनाच्या पॅकेजचा फायदा आम्हाला मिळावा, अशी अपेक्षा एका बांधकाम कामगाराने व्यक्त केली.
-दिलीप गवई, बांधकाम मजूर
--कोट--
यापूर्वी बांधकाम मजूर म्हणून नोंदणी केली होती. त्यानंतर नूतनीकरण केले नाही. करावे लागते हे माहीत नाही. याची कोणी माहिती दिली नाही, कुणी सांगितले नाही. त्यामुळे यापूर्वीच्या लाभापासून वंचित राहिलो आहे. यावेळीही लाभ मिळणार नाही, अशी स्थिती आहे.
-नितीन गुजर, बांधकाम कामगार
--कोट--
बांधकाम मजुरांसाठी शासनाच्या योजना आहेत, त्याची व्यापक प्रसिद्धी झाली, तर अनेक वंचित बांधकाम कामगार या योजनांचा लाभ घेऊ शकतात. शासनाने याबाबत लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. शासनाने सरसकट मदत द्यावी.
-विजय मोरे, बांधकाम कामगार