शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भाजपच्या पहिल्या यादीत पश्चिम वऱ्हाडातील नऊ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:37 IST

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील विद्यमान नऊ आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.

अकोला : राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणावाशिम जिल्ह्यातील विद्यमान नऊ आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. अकोला जिल्ह्यात गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, बुलडाणा जिल्ह्यात चैनसुख संचेती, संजय कुटे, आकाश फुंडकर, तर वाशिम जिल्ह्यात लखन मलिक, राजेद्रं पाटणी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याशिवाय श्वेता महाले यांना चिखलीतून प्रथमच तिकीट मिळाले आहे.अकोला पश्चिम मतदारसंघात गोवर्धन शर्मा हे सलग पाचवेळा निवडुन आले असून, यावेळी त्यांना सहाव्यांदा संधी देण्यात आली आहे. अकोला पूर्व मतदारसंघात २०१४ मध्ये पहिल्यांदा निवडूण आलेल्या रणधीर सावरकर यांना यावेळी दुसरी संधी मिळाली आहे. अकोट मतदारसंघात प्रकाश भारसाकळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर मुर्तीेजापूर मतदारसंघात यावेळी तिकीट निश्चित नसलेल्या आमदार हरीश पिंपळे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघातून पाच वेळा निवडुन आलेले चैनसूख संचेती यांना सहाव्यांदा उमेदवारी देऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. राज्य मंत्री डॉ. संजय कुटे यांना जळगाव जामोद मतदार संघातून उमेदवारी मिळाली असून, ते चवथ्यांदा नशिब आजमावणार आहेत. दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव विद्यमान आमदार यांना खामगाव मतदारसंघातून दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर चिखली मतदारसंघातून श्वेता महाले यांना प्रथमच तिकीट देण्यात आले आहे. वाशिम मतदारसंघातून लखन मलिक यांचे तिकीट निश्चित मानले जात नव्हते, परंतु पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. कारंजा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांना तिसºयांदा संधी देण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019buldhanaबुलडाणाAkolaअकोलाwashimवाशिमBJPभाजपा