माहिती अधिकारातील साडेनऊ हजार अपील प्रकरणे प्रलंबित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:37+5:302021-03-26T04:18:37+5:30
जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, तहसील, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, शासकीय शाळा, अनुदानीत शाळा यांससह विविध शासकीय ...

माहिती अधिकारातील साडेनऊ हजार अपील प्रकरणे प्रलंबित!
जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, तहसील, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, शासकीय शाळा, अनुदानीत शाळा यांससह विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांतर्गत माहिती अधिकारातील व्दितीय अपील प्रकरणे राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठात दाखल केली जातात. माहिती अधिकारात राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे व्दितीय अपील प्रकरणे दाखल होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता, राज्य माहिती आयोगाच्या अमरावती व नागपूर खंडपीठ अंतर्गत २५ मार्चपर्यंत अपील प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणांपैकी ९०० अपील प्रकरणे येत्या एप्रिल अखेरपर्यंत निकाली काढण्याचे नियोजन राज्य माहिती आयोगाच्या दोन्हा खंडपीठामार्फत करण्यात आले आहे.
खंडपीठनिहाय अशी आहेत
प्रलंबित अपील प्रकरणे!
राज्य माहिती आयोगाच्या अमरावती व नागपूर खंडपीठ अंतर्गत माहिती अधिकारातील ९ हजार ५०० अपील प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामध्ये अमरावती खंडपीठ अंतर्गत ७ हजार व नागपूर खंडपीठ अंतर्गत २ हजार ५०० अपील प्रकरणांचा समावेश आहे.
राज्य माहिती आयोगाच्या अमरावती व नागपूर खंडपीठ अंतर्गत सद्यस्थितीत माहिती अधिकारातील ९ हजार ५०० व्दीतीय अपील प्रकरणे प्रलंबित आहे. त्यापैकी ९०० अपील प्रकरणे येत्या एप्रिल अखेरपर्यंत निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
संभाजी सरकुंडे
राज्य माहिती आयुक्त; अमरावती व नागपूर खंडपीठ.