निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाचे काम अर्धवट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 03:42 PM2019-05-07T15:42:53+5:302019-05-07T15:43:52+5:30

हातरुण :  बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे १४ एकरात गावतलाव साकारत असताना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या गावतलावाचे काम ठप्प पडले आहे.

Nimarkada's water lake's work stopped | निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाचे काम अर्धवट!

निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाचे काम अर्धवट!

Next

- संतोष गव्हाळे
हातरुण :  बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे १४ एकरात गावतलाव साकारत असताना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या गावतलावाचे काम ठप्प पडले आहे. ई - क्लास जमिनीवर साकारत असलेल्या या गावतलावाचे काम सुरू करण्याचा मुहूर्त कधी निघतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरनाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाच्या निर्मिती मध्ये निमकर्दा येथील ई - क्लास जमिनीचे खोदकाम करून त्यातील मुरुम वापरण्यात येत आहे. १४ एकरात जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या साह्याने खंडाळा ते मांजरी नाल्याच्या बाजूने गावतलावाचे खोदकाम सुरू होते. या मुरुमाची मोठ्या ट्रकने वाहतूक सुरू होती. मात्र अचानक या तलावाच्या ठिकाणी सुरू असलेले खोदकाम बंद करण्यात आले. १४ एकरातील गावतलावचे काम ठप्प पडल्याने या पावसाळ्यात या तलावात पाणी साठवणार नाही. 
निमकर्दा आणि टाकळी निमकर्दा गावातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी निमकर्दा ते मोरगाव सादीजन मार्गावर १४ एकराच्या गावतलावासाठी प्रयत्न केले. साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाच्या आजूबाजूच्या भिंतीचे काम अर्धवट असून तलावाचे खोलीकरण १० फूट पर्यंत झाले आहे. या तलावाचे खोलीकरण १५ फूटपर्यंत पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी या तलावाचे काम झाल्यास या तलावात पाणीसाठा राहणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या तलावाच्या कामाची बाळापूरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी पाहणी केली होती. मे महिन्यात अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर उपाययोजना करण्यासाठी गावतलावाच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे असतांना याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दृष्काळ सदृष्य परिस्थितीत हा गावतलाव साकारल्यास जीवनदायी ठरणार आहे. या गावतालावामुळे गुराढोरांची तहान भागणार असून नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळणार आहे. गावतलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ होण्याच्या दृष्टीने हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.


बंद पडलेल्या कामाला मुहूर्त सापडेना!

अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरनाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाच्या निर्मिती मध्ये निमकर्दा येथील ई - क्लास जमिनीचे खोदकाम करून त्यातील मुरुम वापरण्यात येत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुरुमाचे खोदकाम बंद करण्यात आले. अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरणा साठी निमकर्दा ऐवजी दुसऱ्या गावातून मुरुम नेण्यात येत असल्याने निमकर्दा गावतलावचे काम ठप्प पडले आहे.

दृष्काळ सदृष्य परिस्थितीत निमकर्दा गावतलाव साकारल्यास जीवनदायी ठरणार आहे. या गावतालावामुळे गुराढोरांची तहान भागणार असून नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळणार आहे. गावतलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ होण्याच्या दृष्टीने हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास लोकसहभाग मिळणार आहे. 
     -  नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर.
 

Web Title: Nimarkada's water lake's work stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.