महापालिकेत मागील तीन वर्षांच्या कालावधीत माेठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. काेट्यवधी रुपयांचे घाेळ चव्हाट्यावर आल्यानंतरही प्रशासनाकडून ठाेस कारवाई हाेत नसल्याची बाब शासनाच्या निर्दशनास आली आहे. यादरम्यान, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या बदलीचे वारे वाहू लागले हाेते. मध्यंतरी आयुक्तपदासाठी राठाेड, सदांशिव तसेच सुनील विंचनकर यांच्या नावाची चर्चा रंगली हाेती. अखेर शासनाने ‘आयएएस’ दर्जाच्या अधिकारी निमा अराेरा यांच्या नियुक्तीवर शिक्कामाेर्तब केल्याचे समाेर आले आहे. बुधवारी शासनाने अराेरा यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.
‘आयएएस’ अधिकाऱ्यासाठी सेनेचे पत्र
मनपातील विविध घाेळ लक्षात घेता शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनपात ‘आयएएस’अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी पत्र दिले हाेते, हे विशेष.
शुक्रवारी स्वीकारणार पदभार
आयुक्तपदी नियुक्त केलेल्या निमा अराेरा शुक्रवारी मनपात दाखल हाेणार असल्याची माहिती आहे. त्या पदभार स्वीकारणार नसल्याच्या वावड्या राजकीय वर्तुळातून उमटत आहेत.
पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती
मनपाची २००१ मध्ये स्थापना झाली. या २० वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच मनपात महिला ‘आयएएस’ अधिकाऱ्याची नियुक्ती हाेणार असल्याने अकाेलेकरांमध्ये त्यांच्या कामाच्या शैलीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.