शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

‘नाईस’ देणार हवामान बदलाचे संकेत; बाजरपेठेची देणार अद्ययावत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 13:29 IST

अकोला : भारत-जर्मनी मिळून यासंबंधी प्रकल्प तयार केला असून, या विषयाचे एक ‘नाईस’ सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे सुरुवातीला राज्यातील ३,७८८ शेतकºयांना मोबाइलवर सल्ला दिला जाईल.

ठळक मुद्देभारत-जर्मनी मिळून यासंबंधी प्रकल्प तयार केला असून, या विषयाचे एक ‘नाईस’ सॉफ्टवेअर विकसित केले आहे. सुरुवातीला अमरावती, यवतमाळ, अहमदनगर, धुळे, परभणी व जालना येथे या प्रकल्पाचे काम केले जाणार.‘नाईस’ प्रकल्पाद्वारे शेतकºयांना पीक संरक्षणाची इत्थंभूत माहिती शेतकºयांना मोबाइलवर दिली जाईल.

- राजरत्न सिरसाट,अकोला : भविष्यातील लोकसंख्येच्या गरजेनुसार अन्नसुरक्षेचे आव्हान देशापुढे असल्याने आतापासून सरकारने विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. मातीचे आरोग्य, हवामान बदलाची अचूक माहिती शेतकºयांना मिळाल्यास कमी खर्चात भरपूर उत्पादन घेण्याच्या दृष्टीने भारत-जर्मनी मिळून यासंबंधी प्रकल्प तयार केला असून, या विषयाचे एक ‘नाईस’ सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे सुरुवातीला राज्यातील ३,७८८ शेतकºयांना मोबाइलवर सल्ला दिला जाईल.‘नाईस’ प्रकल्पासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत राष्टÑीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था हैदराबाद आणि अर्थ, सहकार व विकास मंत्रालय, जर्मनी या दोन देशांमध्ये द्विपक्षीय करार झाला. यामध्ये अन्नसुरक्षा लक्ष्यांक असल्याने शेतातील मातीवर विशेष लक्ष दिले जाईल. मातीचे संवर्धन व मातीचा सामू बघून शेतकºयांनी कोणती पिके घ्यावी, यासाठी सल्ला शेतकºयांना दिला जाईल. हवामान बदलामुळे शेती उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने पीक , पेरणीअगोदर हवामानाचा अचूक सल्ला मिळाल्यास शेतकºयांना तसे नियोजन करता येईल. शेतकºयांनी पिकवलेल्या शेतमालाला पूरक दर मिळावेत, यासाठीची माहिती शेतकºयांना मिळाल्यास त्यादृष्टीने शेतकरी तयारी करतील. म्हणून बाजारपेठेची अद्ययावत माहिती शेतकºयांना मोबाइलवर दिली जाणार आहे. पिकाचे संरक्षण हाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी सध्या स्वत: किंवा त्रोटक माहितीच्या आधारे पीक संरक्षण करतात, त्याचे कधी फायदे तर कधी तोटे समोर येतात; पण आता या ‘नाईस’ प्रकल्पाद्वारे शेतकºयांना पीक संरक्षणाची इत्थंभूत माहिती शेतकºयांना मोबाइलवर दिली जाईल.येत्या खरीप हंगामापासून या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्टÑ व मध्य प्रदेशात करण्यात येणार आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महात्मा जोतिबा फुले कृषी विद्यापीठ, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांना प्रशिक्षित करण्यात येत आहे, तसेच पीक रचनेची माहिती गोळा केली जात आहे. या विषयावर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना बुधवारपासून दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. सुरुवातीला अमरावती, यवतमाळ, अहमदनगर, धुळे, परभणी व जालना येथे या प्रकल्पाचे काम केले जाणार असून, ३,७८८ शेतकºयांना मोबाइलवर हा सल्ला दिला जाईल.

- जर्मनी-भारत मिळून ‘नाईस’ प्रकल्प तयार केला असून, शेतकºयांना माती, शेती, हवामान, बाजारपेठेचा अचूक सल्ला मोबाइलवर दिला जाईल.जी. भाष्कर,प्रकल्प समन्वयक, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ एक्सेटेंशन मॅनेजमेंट, हैदराबाद.

टॅग्स :Akola cityअकोला शहरagricultureशेती