नवविवाहितेवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:38 PM2019-06-28T12:38:22+5:302019-06-28T12:38:38+5:30

एक नवविवाहिता तिच्या एका मैत्रिणीसोबत दुचाकीवर जात असताना पाठीमागून आलेल्या तिच्या पतीने नवविवाहितेवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

A newly married woman assaulted | नवविवाहितेवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

नवविवाहितेवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

Next

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श कॉलनी परिसरात एक नवविवाहिता तिच्या एका मैत्रिणीसोबत दुचाकीवर जात असताना पाठीमागून आलेल्या तिच्या पतीने नवविवाहितेवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. पतीने १० ते १२ वेळा तिच्या शरीरावर हल्ला केल्याने सदर नवविवाहिता गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
सिंधी कॅम्प येथील रहिवासी निशा इंगळे ही तिच्या मैत्रिणीसोबत आदर्श कॉलनीतून दुचाकीने जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एकाने तिच्यावर चाकूने वार सुरू केले. तब्बल १० ते १२ वेळा हल्ला केल्यामुळे निशा जागेवरच गंभीर जखमी झाली. परिसरातील नागरिकांनी तातडीने खदान पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. निशा इंगळे हिचा काही महिन्यांआधी विवाह झाला होता; मात्र पतीसोबत वाद झाल्यानंतर ती काही दिवसांपासून आईकडे राहायला होती. याच वादातून तिचा पती आकाश मांडलेकर याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीचा शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी निशाचा पती आकाश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

 

Web Title: A newly married woman assaulted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.