युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा मुंबईत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 16:34 IST2018-09-29T16:34:25+5:302018-09-29T16:34:48+5:30

अकोला : युवक काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, या निवडणुकीत विजयी झालेल्या प्रदेश पदाधिकारी तथा जिल्हाध्यक्षांचा मुंबई येथील प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे गौरव करण्यात आला.

newly elected office bearers of Youth Congress honoured in mumbai | युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा मुंबईत गौरव

युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा मुंबईत गौरव

अकोला : युवक काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, या निवडणुकीत विजयी झालेल्या प्रदेश पदाधिकारी तथा जिल्हाध्यक्षांचा मुंबई येथील प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिवपदी निवडून आलेले अकोल्यातील सागर कावरे पाटील यांचाही गौरव करण्यात आला. मुंबईतील टिळक भवन येथील कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, काँग्रेस नेते उल्हास पवार, युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. अमित झनक, कुणाल राऊत, नागसेन भरजे, विदर्भ स्तरावरील महासचिव श्रीनिवास नल्लमवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी २०१९ मधील निवडणुका लक्षात ठेवून युवक काँग्रेसने काय भूमिका घ्यावी, याबद्दल सूचना तथा मार्गदर्शन अशोकराव चव्हाण यांनी केले. २०१९ मधे होणाºया निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष यश संपादन करेल व त्यामध्ये युवक काँग्रेसचा महत्त्वाचा वाटा राहील, असे आश्वासन सत्यजित तांबे यांनी दिले. युवक काँग्रेसचा पदाधिकारी-कार्यकर्ता हा गावा-गावांपर्यंतच तसेच घरा-घरांपर्यंत काँग्रेसची विचारधारा घेऊन जाईल, अशी ग्वाहीसुद्धा युवक काँग्रेसच्यावतीने देण्यात आली. कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रदेश पदाधिकारी तथा जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

 

Web Title: newly elected office bearers of Youth Congress honoured in mumbai