नवीन तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर निर्माण व्हावे
By Admin | Updated: November 10, 2014 01:26 IST2014-11-10T01:26:45+5:302014-11-10T01:26:45+5:30
कुलगुरू देशपांडे यांचे मत, अकोला येथे मराठी अर्थशास्त्र परिषदेचा समारोप.

नवीन तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर निर्माण व्हावे
अकोला : आजचे शिक्षण हे लाटेवरचे शिक्षण आहे. शिक्षणाच्या संपूर्ण पायर्या आपण चढतोच असे नाही. २१ शतक हे गव्हर्नसचे युग आहे. या युगात नवीन तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर निर्माण व्हायला हवे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विनायक देशपांडे यांनी रविवारी व्यक्त केले. श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे सुरू झालेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ३८ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी समारोप झाला. यावेळी कुलगुरू देशपांडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विनायक देशपांडे, अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर, डॉ. श्रीराम जोशी, प्रा. चारूदत्त गोखले, डॉ. राजेंद्र भांडवलकर, डॉ. अविनाश निकम, डॉ. सुहास आव्हाड, डॉ. कल्याणकर, डॉ. अशोक खाचणे, डॉ. सुभाष गुर्जर, डॉ. विद्या पाटील, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. एस. पी. देशमुख, डॉ. आर. के. शेख, डॉ. मिलिंद कुलट आदी मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, की १९७७ मध्ये परिषदेची स्थापना झाली, त्यावेळी ५४ सदस्य होते सध्या १000 सभासद आहेत. एकविसाव्या युगात शासनकर्ते कमी व कामे जास्त आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक आहे. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी सुशासन अत्यंत आवश्यक आहे. संवेदनशीलता व भावनाशीलतेसाठी परिषद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.