न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST2021-07-17T04:16:12+5:302021-07-17T04:16:12+5:30

यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच इयत्ता नववीतील ५० टक्के गुण ग्राह्य धरण्यात आले. दरम्यान, ...

New English High School students win | न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी

न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी

यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच इयत्ता नववीतील ५० टक्के गुण ग्राह्य धरण्यात आले. दरम्यान, अकाेला एज्युकेशन साेसायटीद्वारा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूलचा निकाल जाहीर झाला असता मुलींनी बाजी मारल्याचे समाेर आले. हायस्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून एकूण १८४ विद्यार्थी परीक्षेला बसले हाेते. त्यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये शाळेतून ऋतुजा खाेबरखेडे हिला सर्वाधिक ४९६ गुण (९९.०२ टक्के) मिळाले आहेत. तसेच सानिका गणेश उमाळे शाळेत द्वितीय असून तिला ४९० गुण (८७.२० टक्के) प्राप्त असून तृतीय दर्शना शिरसाट हिने ४८० गुण (९६ टक्के) मिळवले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे प्राचार्य माधव मुनशी आणि शिक्षकांनी कौतुक केले आहे.

Web Title: New English High School students win