गावाच्या विकासासाठी तळमळीने कार्य करण्याची गरज : भास्कर पेरे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST2021-02-06T04:32:13+5:302021-02-06T04:32:13+5:30
या वेळी पेरे पाटील म्हणाले, गावातील लोकांना सोबत घेऊन काम केले. राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिला. गावात काय समस्या, काय ...

गावाच्या विकासासाठी तळमळीने कार्य करण्याची गरज : भास्कर पेरे पाटील
या वेळी पेरे पाटील म्हणाले, गावातील लोकांना सोबत घेऊन काम केले. राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिला. गावात काय समस्या, काय अडचणी आहेत हे जाणून घेत, त्या सोडविण्यासाठी कार्य केले. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहभागातून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमधून गावाला आदर्शच नव्हेतर, देशातील एक विकासाचे मॉडेल बनविले. तुमच्या गावाची ओळख ही तुमच्या हातात आहे. गावाला विकासपथावर नेण्यासाठी तुम्हाला ध्येय ठेवावे लागते. प्रबळ इच्छाशक्ती, एकतेतून गावाला आदर्श गाव बनविता येऊ शकते, असे सांगत, भास्कर पेरे पाटील यांनी पाटोदा गावाच्या विकासाबाबत, गाव कसे आदर्श बनविले? कोणकोणत्या योजना राबविल्या? याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश महाराज शेटे यांनी केले. या वेळी वरुर जऊळका परिसरातील नवनिर्वाचित सदस्यांचा शाल व प्रशस्तिपत्र देऊन पेरे पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरी शेटे हिचा सत्कार पेरे पाटील यांनी केला. कार्यक्रमाला युवा ग्रामविकास पॅनलचे सदस्य, ग्राम विकास पॅनलचे सदस्य व परिसरातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. संचालन वैभव नायसे यांनी केले.
फोटो: