संघटन वाढविण्याची गरज- किरण अग्रवाल

By Admin | Updated: October 14, 2015 01:26 IST2015-10-14T01:26:44+5:302015-10-14T01:26:44+5:30

महाराज अग्रसेन जयंती उत्साहात

Need to increase the organization - Kiran Agarwal | संघटन वाढविण्याची गरज- किरण अग्रवाल

संघटन वाढविण्याची गरज- किरण अग्रवाल

अकोला: देशात परिवर्तनाची लाट आहे आणि वेळ तीव्र गतीने सरकत आहे. केवळ जयजयकार करून सामाजिक संघटन निर्माण होणार नाही, तर त्यासाठी सर्व स्तरांतून युद्धस्तरावर प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील अग्रसेवा दलाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल यांनी येथे केले.
महाराज अग्रसेन जयंतीनिमित्त अग्रवाल समाजाच्यावतीने मंगळवारी दुपारी राणी सतिधाम येथून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचा समारोप महाराज अग्रसेन भवन येथे झाला. यावेळी आयोजित समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
अग्रसेन समाज कार्यकर्ते नेटाने कार्य करीत असले तरी त्याची दखल देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर घेतली जात आहे की नाही, हे पाहण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपण कोठे आहोत आणि आपल्याला कोठे जायचे आहे, हे आधी ठरवावे लागेल. तळागाळातील बांधवांच्या प्रगतीकरिता युद्धस्तरावर प्रयत्न करावे लागतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज प्रत्येक जण एकमेकांशी कनेक्ट असला तरी, एकमेकांपासून दूर जात आहे. बदल घडवून आणण्याची प्रचंड शक्ती युवकांमध्ये आहे.
अग्रवाल समाजाचे संघटन वाढवावयाचे असेल, तर युवा वर्गाला आमुलाग्र परिवर्तन घडवावे लागेल. आत्मपरीक्षणाची गरज असून, संघटन वाढीसाठी मरगळ झटकण्याचे आवाहन किरण अग्रवाल यांनी यावेळी केले.

Web Title: Need to increase the organization - Kiran Agarwal