शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीने दिले  अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 2:10 PM

अकोला : ‘ओबीसीं’ची जातीनिहाय जनगणना जाहीर करुन त्यांना निती आयोगाकडून निधीची वेगळीतरतूद करण्यात यावी, ‘क्रिमीलेअर’ची अट रद्द करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

ठळक मुद्देमागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष नेमण्यात यावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह करण्यात यावे. बीसींची जातीनिहाय जनगणना जाहीर करुन त्यांना निती आयोगाकडून निधीची तरतूद करण्यात यावी. स्पर्धा परिक्षेत महिलांना क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

अकोला : ‘ओबीसीं’ची जातीनिहाय जनगणना जाहीर करुन त्यांना निती आयोगाकडून निधीची वेगळीतरतूद करण्यात यावी, ‘क्रिमीलेअर’ची अट रद्द करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष नेमण्यात यावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह करण्यात यावे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना जाहीर करुन त्यांना निती आयोगाकडून निधीची तरतूद करण्यात यावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटींचे भांडवल द्यावे व उद्योग- व्यवसायासाठी १० लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढविण्यात यावी, ‘क्रिमीलेअर’ची अट रद्द करण्यात यावी स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, स्पर्धा परिक्षेत महिलांना क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. या धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, माजी आमदार प्रा.तुकाराम रिकड, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप आगळे, महानगराध्यक्ष अनिल मालगे, राजकुमार मुलचंदाणी, श्रीकांत पिसे पाटील, भारती निम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.शेतकºयांच्या मुलांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज द्या !शेतकºयांच्या तरुण मुलांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे तसेच ‘आयएएस’ ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नॉन क्रिमीलेअरच्या अटीमुळे बाद ठरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीच्यावतीने निवेदनात करण्यात आली आहे.विधानसभा, लोकसभेत २७ टक्के आरक्षण द्या !ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व महानगरपालिकाप्रमाणेच विधानसभा व लोकसभेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात यावी आणि तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्तीचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात यावे, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीच्यावतीने निवेदनात करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस