अकोला पश्चिमवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा दावा
By Admin | Updated: August 1, 2014 02:23 IST2014-08-01T01:45:51+5:302014-08-01T02:23:32+5:30
पदाधिकारी निर्धार मेळाव्यात नेत्यांशी करणार चर्चा

अकोला पश्चिमवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा दावा
अकोला : कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून सुरू असलेल्या शाब्दिक युद्धाचे पडसाद आता जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉॅँग्रेसने दावा केला असून, महानगरामधील पदाधिकारी अकोला येथे रविवारी होणार्या पक्षाच्या मेळाव्यात तशी मागणी करणार आहेत. या मागणीचा ठरावही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी पक्षश्रेष्ठींकडे पाठविणार आहेत.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मुख्यत्वे जात, धर्माच्या आधारेच मतदान होते. प्रत्येक निवडणुकीत मूलभूत सुविधा, विकासाच्या मुद्याला बगल दिली जाते. त्यामुळे दीड दशकांपासून मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. या मतदारसंघात मुस्लीम आणि मराठा समाजाचे प्राबल्य आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसने मराठा आणि अल्पसंख्याक समाजातील मतांवर डोळा ठेवून अकोला पश्चिम मतदारसंघावर दावा केला आहे. पक्षाच्या महानगराच्या बैठकीत अकोला पश्चिम मतदारसंघावर दावा करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. ३ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा निर्धार मेळावा होणार असून, या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते उपस् िथत राहणार आहेत. या मेळाव्यात महानगरातील पदाधिकारी अकोला पश्चिम म तदारसंघाच्या दाव्याबाबत नेत्यांशी चर्चा करणार
आहेत.
*अल्पसंख्याक व मराठा समाजाचे प्राबल्य
२00९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रमाकांत खेतान यांना ३२२४६ , जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढविणारे अजहर हुसेन यांनी २३0६0 , यूडीएफचे अब्दुल मुनाफ अ. रशिद-१५७८, सपाचे नकिर खाँ अहमद खाँ- २७५३, भारिप-बमसंचे हाजी सज्जाद हुसेन अल्ताफ हुसेन-११९0९ आणि अपक्ष अतिफ शाह सिद्दीकी यांनी २६३ मतं मिळविली होती. या मतांची गोळाबेरीज ही भाजपला मिळालेल्या ४४१५६ मतांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अल्पसंख्याक म तांचे विभाजन टाळल्यास या मतदारसंघात भाजप उमेदवारापुढे तगडे आव्हान उभे राहू शकते. याशिवाय निर्णायक संख्येत असलेल्या मराठा समाजाची मतं खेचून आणणार्या उमेदवाराची विजयाकडे वाटचाल सुकर होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
*कॉँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात ठरणार रणनीती
कॉँग्रेसच्या नागपूर येथे होणार्या विभागीय मेळाव्यानंतर विधानसभा निवडणुकीची पक्षाची जिल्ह्यातील रणनीती ठरणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने अकोला पश्चिम म तदारसंघावर दावा केला असला तरी, या पक्षाचे जिल्ह्यात अस्तित्वच नसल्याने जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ काँग्रेसनेच लढवावे, या मुद्यावर जिल्ह्यातील कॉँग्रेसचे पदाधिकारी नेत्यांशी चर्चा करणार आहेत, हे येथे उल्लेखनीय.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. आघाडी आणि महायुतीमधील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे होत आहेत. कॉँग्रेसकडे जिल्ह्यातील अकोला पूर्व, आकोट, बाळापूर आणि अकोला पश्चिम हे चार मतदारसंघ तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे मूर्तिजापूर हा एकमेव मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यात २८८ पैकी १४४ जागांवर दावा केल्याने आघाडीमध्ये तणाव वाढला आहे. अशातच जिल्ह्यातील पदाधिकार्यांनीही अकोला पश्चिम मतदारसंघावर दावा केला आहे. दुसरीकडे, कॉँग्रेसकडे असलेल्या चारही मतदारसंघांमध्ये लढण्यासाठी इच्छुक असलेले अनेक दावेदार पुढे आले आहेत. या सर्व मुद्यांच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पदाधिकारी नागपुरात नेत्यांशी चर्चा करणार आहेत.