बबनराव लोणीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 16:24 IST2020-02-04T16:24:38+5:302020-02-04T16:24:55+5:30
बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला व जोड्यांचा मार देऊन जाहीर निषेध केला.

बबनराव लोणीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार
अकोला : भाजपचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिला तहसिलदाराबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध म्हणून अकोला येथे मंगळवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. धिंग्रा चौकात जिल्हाध्यक्ष उज्ज्वला राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सदस्यांनी बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला व जोड्यांचा मार देऊन जाहीर निषेध केला.
सध्या भाजपचे नेते मंडळी महिलांना काहीही बोलतात. त्यांचा अपमान करतात. सत्ता गेल्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेस हे खपवून घेणार नाही, असे म्हणत सदस्यांनी घोषणाबाजी केली.
आंदोलनात जिल्हाध्यक्षा उज्वला राऊत, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता सावले, शमा बी , शहनाज बी, मंगला गवई, शारदा थोटे, सविता सरदार,दीपमाला खाडे, सिमा गावंडे, आशा पवार,नाइक ताई, मोनाली गवई, जयश्री काटे, आशा ऊके, शिला ढोके, मोेनिका डोंगरे आदि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.