आदीशक्ती अंबाबाईचे आगमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 20:50 IST2020-10-17T20:49:29+5:302020-10-17T20:50:54+5:30
Navratri Festival in Akola शनिवारी अनेक मंडळांनी दुर्गादेवीची विधीवत स्थापना केली.

आदीशक्ती अंबाबाईचे आगमण
अकोला : यंदाच्या सर्वच सण-उत्सवांप्रमाणे नवरात्रोत्सवावरही करोनाचे सावट असून, शनिवार १७ सप्टेंबर रोजी आदीशक्ती अंबाबाईचे थाटात आगमण झाले. कोरोना संसर्गामुळे यंदा हा उत्सव अत्यंत साधेपणाने व कोणताही गाजावाजा न करता साजरा होणार असला, तरी भाविकांचा उत्साह मात्र कायम आहे. यंदा मंडळांचे संख्या घटली असली, तरी शनिवारी अनेक मंडळांनी दुर्गादेवीची विधीवत स्थापना केली.
अकोल्यात दुर्गोत्सवाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे या उत्साहावर विरजण पडले. दरवर्षी दुर्गोत्सवानिमित्त दांडीया, गरबा, विविध आकर्षक आणि भव्यदीव्य देखावे साकारले जातात. यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. मात्र भक्तांमध्ये उत्साह कायम आहे. ना वाद्याचा गजर, ना गुलालाची उधळ, ना आतिषबाजी, अशा स्थितीत शनिवारी दुगार्मातेचे आगमन झाले. मातेसाठी दुर्गोत्सव मंडळांनी सकाळपासूनच तयारी केली होती. ट्रक, ट्रॉली, टेम्पो, आॅटोरिक्षांमधून मातेची मूर्ती आणण्यात आली. भाविकांनी अत्यंत शांततामय वातावरणात आणि फिजीकल डिस्टन्स पाळून मातेची विधीवत स्थापना केली. पुढील नऊ दिवस शहरात मंगलमय वातावरण कायम आहे. दांडीया, गरबा, भव्यदिव्य देखावे नसले तरी भक्तांची मातेवरील अतुट श्रद्धा मात्र अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.