शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

राष्ट्रीयीकृत बँकाचा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 1:42 PM

राष्ट्रीय कृत बँकाची मुजोरी वाढली असून त्यांनी ‘सावकारी अवतार’ धारण केला आहे. बँकाचा हा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर येत असल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी हैराण झाला आहे.

ठळक मुद्देअकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पीक कर्ज वाटपात बँकानी संथपणा केल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बँकामधुन शासकीय ठेवी काढून घेत गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतला.पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बँकांकडून शेतकºयांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.पीककर्ज वाटपासाठी बँकानी चालविलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेणे गरजचे आहे. अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.

- राजेश शेगोकार

अकोला  : पीक कर्ज देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँकेच्या शाखाधिकाऱ्याने महिलेला शरीरसुखाची मागणी केली, कर्ज मागणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला अपमानित केल्याने त्याने आत्महत्या केली. अकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये पीक कर्ज वाटपात बँकानी संथपणा केल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बँकामधुन शासकीय ठेवी काढून घेत गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतला. या सर्व घटना वेगवेगळया ठिकाणी घडल्या असल्या तरी या घटनांमध्ये एक समान सुत्र आहे ते म्हणजे राष्ट्रीय कृत बँकाची मुजोरी वाढली असून त्यांनी ‘सावकारी अवतार’ धारण केला आहे. बँकाचा हा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर येत असल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी हैराण झाला आहे.

कागदपत्रांसाठी ही होते पिळवणूकखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे काम बँकांमार्फत सुरू आहे; मात्र पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बँकांकडून शेतकºयांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक बँकाचे नियम वेगळे त्यामुळे अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनाच बँकाची समन्वय बैठक घेऊन कोणती कागदपत्रे घ्यावीत हे ठरवावे लागले.वाढत्या शेतकरी आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा हे महत्वाचे कारण नमुद केले होते. सावकारांचे व बँकाचे असे दोन्ही कर्ज शेतकºयांचे सारे आर्थिक गणीतच बिघडवून टाकत असल्याने शासनाने कर्जमाफीचे पॅकेज जाहिर केले. या पॅकेज मध्ये शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मुख्यत: फायदा बँकाचाच झाला. अनेक बँकाचा एनपीए वाचला, डबाघाईस आलेल्या बँकानी बाळसे धरले, सहकारी बँकानी तर कातच टाकली. ज्या शेतकºयांच्या साठी कर्जमाफी दिली तो मात्र लगेचच आलेल्या हंगामात पुन्हा कर्जबाजारी झाला. निसर्गाने नेहमीप्रमाणे साथ न दिल्याने त्याचे कर्ज थकित झाले अन् पुन्हा एकदा आत्महत्यांचे चक्र वेगाने फिरू लागले. या पृष्ठभूमीवर युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी दिली त्याचे गुºहाळ अजून सुरूच असून आता पीक कर्ज वाटपाची संथ गती शेतकºयांसाठी संकट ठरत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ९ जुन रोजी अकोल्यात पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला असता अमरावती विभागात राष्ट्रीयीकृत बँकानी केवळ २ टक्का पीक कर्ज वाटप केले होते. याचा चांगलाच समाचार खोतांनी घेतल्यावरही बँकानी हातपाय हलविले नाही अखेर अमरावती विभागातील जिल्हाधिकाºयांनी आक्रमकता दाखविल्याने हा पीक कर्ज वाटप १५ टक्यांपर्यंत आले. वास्तविक कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरी नवीन पीक कर्ज वाटपासाठी पात्र ठरले आहेत. त्यानुषंगाने कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या सर्व शेतकºयांना जुन महिन्याच्या आधीच तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून दिले असते तर पेरणीची सोय लावता आली असती मात्र बँकाचा संथपणा पुन्हा एकदा शेतकºयांना सावकारी चक्र व्युहात अडकवित आहे. बँकाना सरकारकडून निधी वळता होत नसेल तर त्यांनी तसे सरकारला खडसावून सांगावे मात्र त्यासाठी थेट शेतकºयांच्या स्वाभिमानाशी अन् त्यांच्या अर्धांगिणीवर नजर ठेवण्यापर्यत मजल जात असले तर ही नवी सावकारी मोडून काढण्यासाठी सरकारने कठोर होणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या बँकाना कुणाशीही स्पर्धा करावी लागत नाही त्यामुळेच ‘ग्राहक सेवा’ हे केवळ नावापुरतचे राहिले आहे. राष्ट्रीयीकृत बँकामध्ये ग्राहकांशी होणारा व्यवहार हा उद्दामपणाचा असल्याचे अनेक दाखले रोज मिळतात त्यामुळे बुलडाण्यात झालेल्या त्या गंभिर प्रकारासोबतच पीककर्ज वाटपासाठी बँकानी चालविलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेणे गरजचे आहे. अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.

 

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक