पंतप्रधानांना टपालद्वारे पाठविल्या गोवऱ्या; राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 18:50 IST2021-09-04T18:49:56+5:302021-09-04T18:50:17+5:30

Nationalist Women's Congress agitation : पंतप्रधान मोदी यांना चक्क शेणाच्या गोवऱ्या टपालद्वारे पाठवून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला.

Nationalist Women's Congress agitation against gas prise hike at Akola | पंतप्रधानांना टपालद्वारे पाठविल्या गोवऱ्या; राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

पंतप्रधानांना टपालद्वारे पाठविल्या गोवऱ्या; राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

अकोला : घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये सतत हाेणाऱ्या वाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने शनिवारी येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांना चक्क शेणाच्या गोवऱ्या टपालद्वारे पाठवून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला महानगर अध्यक्षा रिजवाना शेख अजीज यांच्या नेतृत्वात येथील मुख्य डाकघरासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी उपाध्यक्षा मंदाताई देशमुख,अख़्तर बेगम, मेघा पाचपोर, सरला वरगट, अनिताताई, माधुरी गिरी, शलीनी योतकार, नाजेमा कलाम, लिना मोहोड, किर्ती नवलकार, कांचन पाचपोर, रुपाली जामने, दिपा शेगोकार,माज़ी महानगर अध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय महासचिव जावेद जाकेरीया,अज़ीज़ शेख सिकंदर,जॉन्सन वरगट, जिल्हा महासचिव धम्मपाल शेगोकार,अबरार खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Nationalist Women's Congress agitation against gas prise hike at Akola