शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

राष्ट्रीय महामार्गावर बस कंटेनरवर आदळली; १२ प्रवाशी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:22 IST

बाळापूर : राष्ट्रीय  महामार्गावर असलेल्या खड्यांमुळे मंगळवारी बाळापूर बायपासवरील मण नदीच्या पुलाजवळ बस कंटेनरवर आदळल्याने १२ प्रवाशी जखमी झाले.

ठळक मुद्देब्रेक न लागल्याने ही बस सरळ कंटेनर क्र. एमएच १२ एफझेड ९५६२ वर आदळली. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तीन दिवसांपासून राष्ट्रीय   महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.

बाळापूर : राष्ट्रीय  महामार्गावर असलेल्या खड्यांमुळे मंगळवारी बाळापूर बायपासवरील मण नदीच्या पुलाजवळ बस कंटेनरवर आदळल्याने १२ प्रवाशी जखमी झाले. यातील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रिधोरा येथे बसच्या धडकेत एक जण ठार झाला होता तर सोमवारी शिवशाहीच्या अपघातात २२ प्रवाशी जखमी झाले होते.नागपूरवरून औरंगाबादकडे बस क्र. एमएच २० बीएफ ३०३५ जात होती. दरम्यान, बाळापूर बायपासवरील मण नदीच्या पुलाजवळ ब्रेक न लागल्याने ही बस सरळ कंटेनर क्र. एमएच १२ एफझेड ९५६२ वर आदळली. त्यामुळे, बसमधील देवराव पूर्णाजी वानखडे, संध्या दे. वानखडे रा. अकोला, वासुदेव चाहदेव लोखंडे, संजय जारे, चेतन राठोड, सचिन लोखंडे सर्व रा. टिटवा, शे. मस्तान शे. अमीर रा. पुसद, सुषमा दारासिंग आडे चिखली, जयकुमार गावंडे रा. लाखनवाडा जि. अकोला यांच्यासह १२ प्रवाशी जखमी झाले. यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर काही प्रवाशांना सुटी देण्यात आली तर गंभीर जखमींना सर्वोपचार रुग्णालयात अकोला येथे हलवण्यात आले.गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रीय   महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. यापूर्वी रिधोरा येथे ३० सप्टेंबरला अपघातात एक ठार, एक गंभीर तर १ आॅक्टोबरला व्याळा जवळ शिवाशाहीच्या अपघातात २२ प्रवाशी जखमी झाले होते. २ आॅक्टोबरला नागपूर-औरंगाबाद बस चालकाने कंटेनरला धडक दिल्याने १२ प्रवाशी जखमी झाले. हे तिन्ही अपघात बस चालकांच्या निष्काळजीपणामुळे झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)

गॅस टँकरला अज्ञात वाहनाची धडक : चालक गंभीरबाळापूर : राष्ट्रीय  महामार्गावरील पिवळा नाला (मदरशाजवळ) खामगावकडून अकोलाकडे जाणाºया टँकरला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना २ आॅक्टोंबर रोजी घडली. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. गॅस टँकर क्र. एमएच ०६ एसी ३५४० खामगाववरुन अकोलाकडे येत होता. यावेळी राष्ट्रीय   महामार्गावरील पिवळा नाल्याजवळ या टॅँकरला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भिषण होती की टॅँकरच्या कॅबीनचा चुराडा झाला. यामध्ये टॅँकर चालक गंभीर जखमी झाला. जखमी चालकाला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात