नाशिकच्या अपघातग्रस्त खेळाडूंनी मिळवले उपविजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 21:06 IST2019-11-29T21:04:28+5:302019-11-29T21:06:35+5:30
पराभूत होवूनही नासिक संघ ठरला बाजीगर; उपविजेतेपद

नाशिकच्या अपघातग्रस्त खेळाडूंनी मिळवले उपविजेतेपद
- ीलिमा शिंगणे-जगडअकोला: बोरगावमंजू जवळ बुधवारी अमरावतीला शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेकरिता जात असलेल्या नासिक विभागाचा १४ वर्षाखालील मुलांच्या संघाचा भिषण अपघात घडला. यामधून सावरलेले खेळाडू बुधवारी मध्यरात्री अमरावतीला पोहचले. गुरू वारच्या सकाळी स्पर्धेत दमदार प्रवेश करीत अमरावती व मुंबई विभागाच्या बलाढय संघांना पराभूत करू न नासिक विभाग अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. शुक्रवारी अंतिम सामन्यात लातूर विभागाला कडवी टक्क र देत नासिक विभागाने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. नासिक विभागाला स्पर्धेत पराभवाचे जरी तोंड पाहावे लागले तरी त्यांच्या जिद्दीला सलाम करीत स्पर्धास्थळी नासिक विभागाचीच चर्चा होती. नासिक विभाग पराभूत होवूनही बाजीगर ठरला.नासिक जिल्हयातील सुरगणा तालुक्यातील अलंगुन येथील प्राथमिक आदिवासी आश्रमशाळेचा खो-खो संघ राज्य स्पर्धेसाठी अमरावतीकडे जात होता. अकोल्यापासून १२ किलो मीटर अंतरावर असताना बोरगाव मंजू नजीक बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान भीषण अपघात घडला. समोरू न येणाºया ट्रकने १३ खेळाडू घेवून जाणाºया गाडीला उडविले. अपघात ऐवढा भयानक होता की, गाडीची अवस्था पाहून पाहणाºयांच्या काळजाचा ठोका चुकल्या शिवाय राहत नव्हता. अपघातामध्ये दोन शिक्षक, गाडी चालक आणि तीन खेळाडू गंभीर जखमी झाले. गाडीतील सर्वांनी एका क्षणात समोर मरण बघितले. गाडीच्या धडकेच्या आवाजाबरोबर, किंकाळया आणि जखमांमधून भळभळ वाहणारे रक्त...सगळं अकल्पित. मरणाला चकवा देत सर्वजण परतले. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे चिमुकले खेळाडूंना मानसिक धक्का पोहचला. मात्र, अकोलेकर क्रीडाप्रेमी,क्रीडाशिक्षक, क्रीडा संघटना, क्रीडा पत्रकार यांनी खेळाडूंना सर्वोतोपरी मदत केली. मानसिक धक्क्यातून खेळाडूंना बाहेर काढले. आणि स्पर्धा खेळण्यास प्रवृत्त करू न स्पर्धास्थळी सुखरू प पोहचविले. तर गंभीर जखमींचा रू ग्णालयात उपचार सुरू होता. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.कठीण प्रसंगात यशाचा मार्ग अवघड दिसत असूनही चिमुकले खेळण्यास सज्ज झाले. जिंकण्याची जिद्द आणि कु ठल्याही परिस्थितीत पराभूत व्हायचे नाही, हा मंत्र क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांकडून प्रत्येक खेळाडूंना मिळत असते. हाच मंत्र जपत अलंगुणच्या खेळाडूंनी नासिक विभागाचे प्रतिनिधीत्व करीत बलाढ्य लातूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणाºया उस्मानाबाद संघाला बरोबरीची टक्कर दि