नरेश पुनकर कला गौरव पुरस्काराने सम्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:27+5:302021-02-05T06:18:27+5:30

विश्वकर्मा प्रतिष्ठानाच्या वतीने चित्रपट अभिनेता निळू फुले स्मृती कला गौरव पुरस्कार व या वर्षीचा कला महर्षि बाबूराव पेंटर ...

Naresh Punkar awarded Kala Kala Gaurav Award | नरेश पुनकर कला गौरव पुरस्काराने सम्मानित

नरेश पुनकर कला गौरव पुरस्काराने सम्मानित

विश्वकर्मा प्रतिष्ठानाच्या वतीने चित्रपट अभिनेता निळू फुले स्मृती कला गौरव पुरस्कार व या वर्षीचा कला महर्षि बाबूराव पेंटर स्मृति कला गौरव पुरस्कार प्रदान केला जाताे. यंदा हा पुरस्कार अकाेट येथील कलावंत नरेश पुनकर यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे पूर्व विशेष पोलिस महासंचालक डाॅ. विठ्ठलराव जाधव व वरिष्ठ समाजसेवक भास्करराव कदम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. गौतम बेंगाले होते. कार्यक्रमात भीमराव दले, नितीन गायकवाड, अमिता लोणकर, गणपतराव बारवकर, रवींद्र रायकर, वलय मुलगुंद, प्रमोद सूर्यवंशी, संजय भालेराव, राजेंद्र गाडेकर, सचिन सुतार, माधवराव पांचाल आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिति होती. कार्यक्रमाचे संयोजन विश्वकर्मा प्रतिष्ठानाचे विष्णू गरूड, गणेश राऊत, प्रदीप राजगुरू, दीपक पांचाल, देवीदास गवले यांनी केले होते. लाकडांपासून विविध कलाकृती निर्माण करणारे सावरा तालुका अकोट येथील नरेश पुनकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

फाेटाे

Web Title: Naresh Punkar awarded Kala Kala Gaurav Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.