ज्येष्ठ नागरिक भुवनच्या अध्यक्षदी नाना इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:20 IST2021-03-01T04:20:57+5:302021-03-01T04:20:57+5:30

ज्येष्ठ नागरिक भुवन नेरुळ, नवी मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्काॅम)चे उपाध्यक्ष ना.ना. ...

Nana Ingle, President of Senior Citizen Bhuvan | ज्येष्ठ नागरिक भुवनच्या अध्यक्षदी नाना इंगळे

ज्येष्ठ नागरिक भुवनच्या अध्यक्षदी नाना इंगळे

ज्येष्ठ नागरिक भुवन नेरुळ, नवी मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्काॅम)चे उपाध्यक्ष ना.ना. इंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

पूर्वाध्यक्ष डॉ. एस.पी. किंजवडेकर यांच्या निधनाने अध्यक्षपद रिक्त झाले होते. फेस्कॉमचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी नानांचे नाव सुचविले, तर आयस्काॅनचे माजी अध्यक्ष चापके यांनी अनुमोदन दिले.

सदर निवडीबाबत फेस्काॅमचे अतिरिक्त मुख्य सचिव अभि. विनायक पांडे विदर्भ पश्चिमचे अध्यक्ष प्रकाश पिंपरकर, सचिव डॉ. सुहास काटे प्रादेशिक कृषी समितीचे अध्यक्ष चोथमल सारडा, संघटक सा.ब. शेलकर, अकोला जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष नारायण अंधारे यांनी ज्येष्ठांच्या समस्या मार्गी लागण्यास माेलाची मदत हाेईल अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: Nana Ingle, President of Senior Citizen Bhuvan