बार्शीटाकळी तालुका क्रीडा संकुलास वसंतराव नाईक यांचे नाव द्या!

By रवी दामोदर | Updated: July 12, 2023 18:40 IST2023-07-12T18:40:37+5:302023-07-12T18:40:48+5:30

वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिली धडक

Name Vasantrao Naik for Barshitakali Taluka Sports Complex! | बार्शीटाकळी तालुका क्रीडा संकुलास वसंतराव नाईक यांचे नाव द्या!

बार्शीटाकळी तालुका क्रीडा संकुलास वसंतराव नाईक यांचे नाव द्या!

अकोला : बार्शीटाकळी तालुका क्रीडा संकुलास वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करीत वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने आंदोलन करीत १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्यासंदर्भात स्मरण म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बुधवार, दि.१२ जूलै रोजी दुपारच्या सुमारास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात धडक देऊन जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांची चर्चा केली.

जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी तालुका क्रीडा संकुल अध्यक्ष, आमदार, सदस्य व तहसीलदार यांच्यासमवेत युवा आघाडीचे कार्यकर्ते अशी संयुक्त बैठक बोलावून यासंदर्भात तोडगा काढू, असे आश्वासन दिले.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, दादाराव पवार, सचिन शिराळे, समीर पठाण, जय रामा तायडे, नासरी चव्हाण, श्रीकृष्ण देवकुनबी, अमित मोरे, आदित्य इंगळे, अमोल जमानिक, अक्षय राठोड, अर्जुन टप्पे, अनिल राठोड, धीरज इंगळे, आकाश जंजाळ, राजेश बोदडे, आकाश धूळभरे, चिकू वानखेडे, आशिष सोनोने, गुड्डू राठोड, बाळू राठोड, धीरज अंभोरे, स्वप्नील बागडे, धम्मपाल तायडे, आशिष जाधव, आदित्य दास, अनिकेत सावळे, अजय अंभोरे, अनुराग इंगळे, आकाश नितोने, पप्पू अरखराव, समीर डोंगरे, सचिन सरकटे आदी उपस्थित होते.

Web Title: Name Vasantrao Naik for Barshitakali Taluka Sports Complex!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.