गाढवाला दिले दानवेंचे नाव
By Admin | Updated: May 12, 2017 16:21 IST2017-05-12T16:21:46+5:302017-05-12T16:21:46+5:30
युवक काँग्रेसकडून दानवे यांचा निषेध

गाढवाला दिले दानवेंचे नाव
युवक काँग्रेसकडून दानवे यांचा निषेध
अकोला : तूर खरेदीवरून आधीच हवालदिल झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या विषयी शिवराळ भाषेचा वापर करून शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळणार्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा अकोला लोकसभा युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जाहीर निषेध करण्यात आला. स्थानिक मदनलाल धिंग्रा चौकात युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश गणगणे यांच्या नेतृत्वात निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आले. यावेळी एका गाढवाच्या गळय़ात दानवे यांचा उल्लेख असलेले फलक टाकून त्याला दानवे हे नाव देण्यात आले. सिटी कोतवाली पोलिसांनी निदर्शने सुरु करण्याआधीच दानवे यांचे नाव दिलेल्या गाढवाला ताब्यात घेतले. त्यानंतरही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांनाही स्थानबद्ध केले. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला निषेध करायचा नैतिक अधिकार नसल्याचे यावेळी महेश गणगणे म्हणाले. या आंदोलनात नगरसेवक पराग कांबळे, राजेश मते, पातुर नगरसेवक सै. अझरुद्दीन, गणेश कळसकर, सागर कावरे, सै . वसिमुद्दीन, आकाश शिरसाट, सै. शहजाद, तुषार हिवरे, मोहम्मद शारिक, राहुल थोटांगे, चेतन कोंडाणे, विशाल इंगळे, राम पाचपोर, कशीश खान, अतुल सपकाळ, गिरीश करसकार, राजकुमार शिरसाट, गजानन शिरसाट, पियुष तिरुख, तुषार गावंडे, देविदास कोकाटे, साजीद, रब्बानी शहा, गणेश टाले, रजीनीकांत अडसुळ, शेख अनिस, शेख अयुब, राजेश कांबळे, सोनु भल्लाळ, आनंद भल्लाळ, गजानन शिंदे, सोमनाथ, दिपक खवले, लखन गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.