नागपूरच्या युवकाचे प्रेत बाळापुरात सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:52 IST2019-04-11T23:51:15+5:302019-04-11T23:52:47+5:30

नागपूरच्या युवकाचे प्रेत बाळापुरात सापडले.

Nagpur's youth found dead in Balapur | नागपूरच्या युवकाचे प्रेत बाळापुरात सापडले

नागपूरच्या युवकाचे प्रेत बाळापुरात सापडले

href='http://www.lokmat.com/topics/balapur/'>बाळापूर: नागपूर येथील शिरसोद रेशीमबाग परिसरात राहणाºया ३० वर्षीय युवकाचा मृतदेह १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आढळला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गौरव विनोद गाढवे असे मृतक युवकाचे नाव आहे. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याविषयी पोलीस शोध घेत आहेत. बाळापूर शहरातून वाहणाºया मन नदी पात्रात एक प्रेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असता ३० ते ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळला. मृतदेहाची तपासणी केली असता मृतकाच्या खिशात नागपूर ते शेगावचे कालचे तिकीट आढळले. तिकिटाच्या मागील बाजूस काहीतरी आकडे लिहिलेले पोलिसांना आढळले; परंतु तिकिटाचे दोन तुकडे झाल्याने त्याला जोडून पडताळणी केली असता तो डॉट पेनने लिहिलेला मोबाइल क्रमांक असल्याचे लक्षात आले. बाळापूर पोलिसांनी त्यावर संपर्क करून मृतकाचे वर्णन सांगितले असता सदर प्रेत हे गौरव विनोद गाढवे रा. रेशीमबाग चौक, शिरासपेठ, नागपूर याचे असल्याचे समोर आले. तो दर्शनासाठी शेगावला रात्री रेल्वेने गेल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे स्टेशनवर किरकोळ भांडण झाल्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Nagpur's youth found dead in Balapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.