अकोला मार्गे नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे वन वे स्पेशल रेल्वे २४ व २५ ला
By Atul.jaiswal | Updated: October 18, 2023 18:04 IST2023-10-18T18:03:34+5:302023-10-18T18:04:25+5:30
०१०३० नागपूर-पुणे एकेरी विशेष गाडी मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १७.४५ वाजता पोहोचेल.

अकोला मार्गे नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे वन वे स्पेशल रेल्वे २४ व २५ ला
अकोला : आगामी दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने नागपूर ते मुंबई, नागपूर ते पुणे व नागपूर ते सोलापूर या मार्गावर चार एकेरी (वन वे) विशेष गाड्या २४ व २५ ऑक्टोबर रोजी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०१०१८ नागपूर-एलटीटी वन वे स्पेशल एक्स्प्रेस मंगळवार. २४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून २०.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल. याच प्रमाणे ०१०३२ नागपूर-एलटीटी वन वे स्पेशल गाडी बुधवार, २५ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून १५.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०८.१५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण येथे थांबा देण्यात आला आहे.
नागपूर-पुणे विशेष मंगळवारी
०१०३० नागपूर-पुणे एकेरी विशेष गाडी मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १७.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड स्थानकांवर थांबेल. ०१०२९ सोलापूर-नागपूर एकेरी सुपरफास्ट स्पेशल मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी २०.२० वाजता सोलापूर येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १३.०५ वाजता पोहोचेल. ही गाडी सोलापूर, कुरुडवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा आणि नागपूर येथे थांबणार आहे.