नागपुर –मडगांव उत्सव विशेष गाडी शुक्रवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:52 PM2020-10-19T17:52:54+5:302020-10-19T17:53:01+5:30

Nagpur-Madgaon festival special train नागपूर ते मडगाव ही विशेष गाडी येत्या २३ ऑक्टोबरपासून आठवड्यातून एकदा धावणार आहे.

Nagpur-Madgaon festival special train from Friday | नागपुर –मडगांव उत्सव विशेष गाडी शुक्रवारपासून

नागपुर –मडगांव उत्सव विशेष गाडी शुक्रवारपासून

googlenewsNext

अकोला : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता प्रवाशांची उसळणारी संभाव्य गर्दी कमी करण्याच्या हेतुने मध्य रेल्वेने उत्सव विशेष गाड्या सुरु केल्या असून, या अंतर्गत अकोला स्थानकावरून जाणारी नागपूर ते मडगाव ही विशेष गाडी येत्या २३ ऑक्टोबरपासून आठवड्यातून एकदा धावणार आहे. ठराविक काळासाठी चालविण्यात येणारी ही गाडी पूर्णपणे आरक्षीत राहणार असून, केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच यामधून प्रवास करता येणार आहे.

गाड़ी क्रमांक ०१२३५ अप नागपुर –मडगांव ही विशेष गाड़ी २३ ऑक्टोबर पासून ते ६ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारला नागपूर स्टेशनहुन दुपारी चार वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी दुपारी ४.४० वाजता मडगांव स्टेशनला पोहचेल. ही गाडी शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वाजता येऊन ७.४७ वाजता पुढील प्रवासाकरीता रवाना होईल.

गाड़ी क्रमांक ०१२३६ डाउन मडगांव - नागपुर ही विशेष गाड़ी २४ ऑक्टोबर पासून ते ७ नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारला मडगांव स्टेशनहुन सायंकाळी ७.४० वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी नागपुर स्टेशनला रात्री ८.३० वाजता पोहचेल . ही गाडी अकोला स्थानकावर दर रविवारी दुपारी ३.५५ वाजता येऊन ३.५७ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावल ,नासिक ,इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, मानगाँव, खेड, चिपळून, संगमेश्वर रोड ,रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कनकावली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाड़ी रोड ,थिवंम, करमाली येथे थांबा राहणार आहे. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड- 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Web Title: Nagpur-Madgaon festival special train from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.